CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Daryl Mitchell 5 Catches: चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू डॅरिल मिचेलने फलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही कमाल करत तब्बल 5 कॅच पकडले.
Daryl Mitchell | CSK | IPL
Daryl Mitchell | CSK | IPLSakal

Daryl Mitchell 5 Catches: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 46 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात रविवारी (28 एप्रिल) पार पडला. एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नईने 78 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात डॅरिल मिचेलने एक मोठा विक्रम केला आहे.

या सामन्यात चेन्नईने हैदराबादसमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघ 18.5 षटकात 134 धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान त्यांच्या 10 पैकी 9 विकेट्स या झेलबादच्या स्वरुपात गेल्या. विशेष म्हणजे 9 झेलांपैकी 5 झेल एकट्या डॅरिल मिचेलने पकडल्या.

Daryl Mitchell | CSK | IPL
Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

मिचेलने ट्रेविस हेड,अभिषेक शर्मा, हेन्रिच क्लासेन, शाहबाज अहमद आणि पॅट कमिन्स यांचे झेल घेतले आहेत. त्यामुळे तो आयपीएलमध्ये एकाच सामन्यात 5 झेल घेणारा केवळ 2 दुसरा क्षेत्ररक्षक (यष्टीरक्षक नसलेला) ठरला आहे.

यापूर्वी असा विक्रम केवळ मोहम्मद नबीने केला आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना 2021 मध्ये 5 झेल पकडले होते.

तसेच कुमार संगकाराने आयपीएलमध्ये यष्टीरक्षण करताना 5 झेल पकडण्याचा विक्रम केला. त्याने 2011 मध्ये डेक्कन चार्जर्ससाठी खेळताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध हा विक्रम केला होता.

Daryl Mitchell | CSK | IPL
T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

फलंदाजीतही डॅरिलचं अर्धशतक

दरम्यान चेन्नईकडून फलंदाजी करतानाही डॅरिलने चांगली कामगिरी केली. त्याने कर्णधार ऋतुराजबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. यादरम्यान त्याने 32 चेंडूत 52 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारला.

तसेच चेन्नईकडून ऋतुराजने 54 चेंडूत 98 धावांची खेळी केली. त्याचे शतक थोडक्यात हुकले. त्याच्या या खेळीत त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले. तसेच शिवम दुबेने 20 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. त्यामुळे चेन्नईने 20 षटकात 3 बाद 212 धावा केल्या.

गोलंदाजीत चेन्नईकडून तुषार देशपांडेने 4 विकेट्स घेतल्या. तसेच मुस्तफिजूर रेहमान आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. त्याचबरोबर रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com