Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Daryl Mitchell: चेन्नई सुपर किंग्सची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी झाला होता. पण त्यानंतर मिचेलने केलेल्या कृतीने त्या चाहत्याला मोठा आनंदही दिला.
Daryl Mitchell gift gloves to injured fan
Daryl Mitchell gift gloves to injured fanSakal

Chennai Super Kings: टी20 क्रिकेट म्हटले अनेकदा चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. त्यासाठी फलंदाजही मोठ्या फटक्यांचा सराव करत असतात. असाच सराव चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू डॅरिल मिचेल करत असताना एका चाहत्याला मात्र चेंडू लागला होता, पण त्यानंतर त्याला त्याच्याकडून खास भेटही मिळाली.

झाले असे की चेन्नई सुपर किंग्स संघाने रविवारी (5 मे) इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत (IPL) धरमशाला येथे झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध 28 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यापूर्वी फलंदाजीचा सराव डॅरिल मिचेल करत होता.

Daryl Mitchell gift gloves to injured fan
IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

त्यावेळी प्रेक्षकही स्टँडमध्ये उपस्थित होते. त्याचवेळी मिचेलने खेळलेला एक जोरदार शॉट एका प्रेक्षकाला जोरात लागला आणि तो वेदनेने खाली वाकला. यादरम्यान, प्रेक्षकाचा आयफोनचेही नुकसान झाले.

पण प्रेक्षकाला चेंडू लागल्याचे लक्षात येताच मिचेलने नेट्समधून त्याची आधी माफी मागितली, त्यानंतर त्याने त्याला त्याचे ग्लव्हजही भेट दिले. ते ग्लव्हज भेट मिळाल्यानंतर तो प्रेक्षकही खूप आनंदी दिसत होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, मिचेलच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले, तर त्याला अद्याप फारशी छाप आयपीएल 2024 मध्ये पाडता आलेली नाही. त्याने 10 सामन्यांत 229 धावा केल्या आहेत, यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच त्याने एक विकेटही घेतली आहे.

Daryl Mitchell gift gloves to injured fan
MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

तसेच चेन्नई सुपर किंग्सने आत्तापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांपैकी 6 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 5 सामन्यांत पराभव स्विकारला आहे. त्यामुळे चेन्नई सध्या पाँइंट्सटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत. (Daryl Mitchell gift gloves to injured fan)

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 167 धावा केल्या होत्या. त्यानंतर पंजाब किंग्सला 168 धावांचा पाठलाग करताना 20 षटकात 9 बाद 139 धावाच करता आल्या होत्या.

या सामन्यात चेन्नईसाठी रविंद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी करत मोलाचा वाटा उचलला होता. त्याने फलंदाजीत सर्वाधिक 43 धावा केल्या होत्या, तर गोलंदाजी करताना सर्वाधिक 3 विकेट्स घेतले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com