DC vs RR : ऑस्ट्रेलियन जोडी ठरली राजस्थानसाठी कर्दनकाळ | Delhi Capitals Beat Rajasthan Royals | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Capitals Beat Rajasthan Royals David Warner Mitchell Marsh

DC vs RR : ऑस्ट्रेलियन जोडी ठरली राजस्थानसाठी कर्दनकाळ

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने मिशेल मार्शच्या 89 आणि डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सचे 160 धावांचे आव्हान 18.1 षटकात पार केले. दिल्लीने मस्ट विन सामन्यात विजय मिळवत प्ले ऑफच्या आशा जीवंत ठेवल्या.

राजस्थानकडून फक्त ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी एक विकेट घेता आली. राजस्थानकडून बॅटिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आर. अश्विनने अर्धशतकी खेळी केली. तर त्याला साथ देणाऱ्या देवदत्त पडिक्कलने देखील 48 धावांची झुंजार खेळी केली. (Delhi Capitals Beat Rajasthan Royals Australian Pair David Warner Mitchell Marsh Shine)

हेही वाचा: मुंबई इंडियन्सची ही आहे पुढच्या 10 वर्षाची 'गुंतवणूक'

राजस्थान रॉयल्सने विजयासाठी ठेवलेले 160 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लाला ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात धक्का दिला. त्याने श्रीकार भारतला शुन्यावर बाद केले. त्यानंतर मात्र मिशेल मार्शने दमदार अर्धशतक ठोकत आपला ऑस्ट्रेलियन पार्टनर डेव्हिड वॉर्नरबरोबर दुसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचली. अखेर युझवेंद्र चहलने दिल्लीच्या 62 चेंडूत 89 धावा करणाऱ्या मिशेल मार्शला बाद करत दिलासा दिला. त्याने डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांची 144 धावांची भागीदारी संपवली.

मात्र तोपर्यंत सामना राजस्थानच्या हातातून निघून गेला होता. ऋषभ पंतने सलग दोन षटकार मारत सामना जवळ आणला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने तीन धावा करत आपले अर्धशतक आणि सामना देखील जिंकून दिला.

हेही वाचा: किशन म्हणतो माझ्या डोक्यात 15.25 कोटी रूपये होते पण...

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम राजस्थान रॉयल्सला फलंदाजीला पाचारण केले. चेतन साकरियाने राजस्थानचा स्टार जॉस बटलरला 7 धावांवर बाद केले. त्यानंतर राजस्थानने आर. अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची खेळी केली. ही खेळी काम करून गेली. अश्विन आणि यशस्वी जैसवाल यांनी राजस्थानला अर्धशतकी मजल मारून दिली. मात्र मिशेल मार्शने 19 धावा करणाऱ्या जैसवालला बाद केले.

यानंतर अश्विनने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत देवदत्त पडिक्कलबरोबर भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी संघाला शतकी मजल मारून दिली. मात्र ही 53 धावांची भागीदारी मिशेल मार्शने फोडली. त्याने 50 धावा करणाऱ्या अश्विनला माघारी धाडले.

दरम्यान, देवदत्त पडिक्कलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतले त्याने 30 चेंडूत 48 धावांची खेळी करत संघाला 150 च्या जवळ पोहचवले. मात्र त्याला संजू सॅमसन (6), रियान पराग (9) यांची फार काळ साथ लाभली नाही. अखेर मोक्याच्या क्षणी नॉर्त्जेने पडिक्कलला बाद केले. त्यानंतर डुसेन आणि बोल्टने राजस्थानला 160 धावांपर्यं मजल मारून दिली.

Web Title: Delhi Capitals Beat Rajasthan Royals Australian Pair David Warner Mitchell Marsh Shine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top