
Axar Patel Named Delhi Capitals Captain: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत गेल्या तीन हंगामांप्रमाणेच यंदाच्या हंगामातही १० संघ खेळताना दिसणार आहेत. दरम्यान आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी नऊ संघांच्या कर्णधारावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण स्पर्धेला १० दिवसच शिल्लक असतानाही दिल्ली कॅपिटल्सने कर्णधाराची घोषणा केली नव्हती. पण अखेर शुक्रवारी (१४ मार्च) दिल्ली कॅपिटल्सने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.