मुंबई इंडियन्सची ही आहे पुढच्या 10 वर्षाची 'गुंतवणूक' | Harbhajan Singh Mumbai Indians Future Investment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harbhajan Singh Mumbai Indians Future Investment

मुंबई इंडियन्सची ही आहे पुढच्या 10 वर्षाची 'गुंतवणूक'

आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ कोणता असे विचाले तर एकच उत्तर येते, ते म्हणजे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians). मुंबईने तब्बल पाचवेळा विजेतेपदाला गवसणी घातली आहे. मात्र यंदाच्या 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्सची अवस्था बिकट झाली. त्यांनी सलग आठ सामने गमवले. त्यामुळे त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीतून देखील बाहेर पडावे लागले. आयपीएल लिलाव 2022 (IPL Auction 2022) मध्ये मुंबई संघाचा चेहरा मोहरचा बदलला.

हेही वाचा: किशन म्हणतो माझ्या डोक्यात 15.25 कोटी रूपये होते पण...

मात्र मुंबई यंदाच्या हंगामात जरी खराब कामगिरी करत असली तरी त्यांना काही दमदार खेळाडू देखील मिळाले आहेत. हे खेळाडू भविष्यात मुंबईसाठी ट्रंपकार्ड ठरू शकतात. याबाबत बोलताना भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने देखील हेच बोलून दाखवले. हरभजन सिंगने (Harbhajan Singh) स्टार स्पोर्ट्सशी बोलताना मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंची नावे घेतली. त्याने तिलक वर्मा (Tilak Verma) आणि डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) हे दोन खेळाडू येत्या 10 वर्षासाठी मुंबईची एक चांगली गुंतवणूक ठरण्याची शक्यता आहे असे सांगितले.

हेही वाचा: मोहम्मद रिझवान म्हणतो, मी पुजाराला खूप त्रास दिला

हरभजन सिंग म्हणाला की, 'तिलक वर्मा आणि डेवाल्ड ब्रेविस मुंबई इंडियन्ससाठी एका गुंतवणुकीसारखे आहेत. या संघाने युवा गुणवत्तेवर चांगल्या प्रकारे गुंतवणूक केली आहे. याचा फायदा संघाला अनेक वर्षे होणार आहे. डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्माने यंदाच्या हंगामात आपल्या गुणवत्तेची झलक दाखवली आहे. आता ते या खेळाडूंना येणाऱ्या 10 वर्षासाठी मुंबई इंडियन्सची जर्सी देण्याची शक्यता आहे.'

Web Title: Harbhajan Singh Says Tilak Verma Dewald Brevis Is Mumbai Indians 10 Years Investment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top