
मुंबई इंडियन्सने बुधवारी (२२ मे) दिल्ली कॅपिटल्सला इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ५९ धावांनी पराभूत केले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना झाला होता. या सामन्यातील पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२५ स्पर्धेतील आव्हानही संपले.
मुंबई प्लेऑफमध्ये पोहचणारा चौथा संघ ठरला आहे. दरम्यान, दिल्लीला पराभवासह आणखी एक धक्का बसला आहे. दिल्लीचा अनुभवी वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याच्यावर बीसीसीआयने कारवाई केली आहे.