DC vs RR: सॅमसनच्या विकेटमुळे सामन्यातील राड्यानंतर दिल्लीचे संघमालक अन् राजस्थानच्या कर्णधारामध्ये काय झालं? Video आला समोर

Sanju Samson - Parth Jindal: आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या विकेटनंतर वाद झाला होता. दरम्यान, या सामन्यानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात सॅमसन आणि पार्थ जिंदाल दिसत आहेत.
Parth Jindal Meets Sanju Samson
Parth Jindal Meets Sanju SamsonSakal

Sanju Samson - Parth Jindal Video: मंगळवारी (8 मे) इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत (IPL) दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 20 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनची विकेट वादग्रस्त ठरली.

त्यामुळे सामन्यात वादही झाल्याचे पाहायला मिळाले, यादरम्यान दिल्लीचे संघमालक पार्थ जिंदाल हे देखील चर्चेत होते. आता या सामन्यानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात संजू सॅमसन आणि पार्थ जिंदाल दिसत आहेत.

Parth Jindal Meets Sanju Samson
Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

सामन्यात काय झालेलं?

या सामन्यात दिल्लीने राजस्थान समोर 222 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला सॅमसन दमदार फलंदाजी करत होता. त्याच्या खेळामुळे राजस्थानच्या विजयाच्या आशा कायम होत्या.

पण अशातच 16 व्या षटकात मुकेश कुमारने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर संजू सॅमसन 46 चेंडूत 86 धावांवर झेलबाद झाला. मात्र, शाय होपने लाँग-ऑनला पकडलेला त्याचा झेल वादाच्या भोवऱ्यात अडकला. त्याने हा झेल बाउंड्री लाईनजवळ पकडला होता. त्यामुळे हा झेल पकडताना त्याचा पाय बाउंड्री लाईनला लागला की नाही, यावरून हा वाद झाला.

दरम्यान, थर्ड अंपायरने हा झेल योग्य असल्याचे म्हणत सॅमसनला बाद दिले होते. त्यामुळे सॅमसन आणि मैदानातील अंपायरमध्ये वादही झाले होते. याच घटेनेदरम्यान स्टँडमध्ये बसलेले पार्थ जिंदाल उत्साहाने 'आऊट...आऊट' असं ओरडताना दिसले. त्याचमुळे पार्थ जिंदाल सामन्यानंतर मोठ्या प्रमाणात ट्रोलही झाले.

सामन्यानंतरचा व्हिडिओ आला समोर

दरम्यान, सामन्यात हा मोठा वाद झाला असला, तरी सामन्यानंतर मात्र घडलेल्या गोष्टी मागे टाकत संजू सॅमसन आणि पार्थ जिंदाल गप्पा मारताना दिसले, यावेळी त्यांच्याबरोबर राजस्थानचे सहसंघमालक मनोज बडाले देखील होते. त्यांचा चर्चा करतानाचा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी शेअर केला आहे.

या व्हिडिओला दिल्लीने कॅप्शन दिले आहे की 'आमचे चेअरमन आणि सहसंघमालक पार्थ जिंदाल यांनी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि संघमालक मनोज बदाले यांच्याशी अरुण जेटली स्टेडियमवर सामन्यानंतर संवाद साधला. पार्थ यांनी राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराचे आगामी टी२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल अभिनंदनही केले.'

Parth Jindal Meets Sanju Samson
IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

दिल्लीचा विजय

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर सॅमसन बाद झाल्यानंतर राजस्थानला 20 षटकात 8 बाद 201 धावाच करता आल्या. गोलंदाजीत दिल्लीकडून खलील अहमद, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल आणि रसिक सलाम यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने 20 षटकात 8 बाद 221 धावा केल्या. दिल्लीकडून अभिषेक पोरेलने 65 आणि जॅक फ्रेझर-मॅकगर्कने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली, तर ट्रिस्टन स्टब्सने 41 धावा केल्या.

राजस्थानकडून गोलंदाजीत आर अश्विनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com