
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी (१६ एप्रिल) राजस्थान रॉयल्सविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. पण अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यावेळी मैदानात अनेक नाट्यमय घटना घडल्या.
यातील एक म्हणजे दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक मुनाफ पटेल याचा फोर्थ अम्पायरशी झालेला वाद. पण हा वाद त्याला चांगलाच महागात पडला आहे. त्याच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएलच्या आचार संहितेचे उल्लंघन केल्याने कारवाई केली आहे.