IPL 2025 ...म्हणूनच त्याला जास्त पैसे मिळतात; DC vs RR मधील सुपर ओव्हरनंतर डेल स्टेनची पोस्ट चर्चेत

Dale Steyn Tweet: बुधवारी दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा धक्का दिला. दिल्लीच्या या विजयात मिचेल स्टार्कने मोलाचा वाटा उचलला. या सामन्यादरम्यान डेल स्टेनने केलेल्या पोस्ट मात्र चर्चेत राहिल्या.
IPL 2025 | Axar Patel - Mitchell Starc
IPL 2025 | Axar Patel - Mitchell StarcSakal
Updated on: 

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत बुधवारी (१६ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये रोमांचक विजय मिळवला. दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर हा सामना पार पडला.

या सामन्यात निर्धारित २०-२० षटकांनंतर बरोबरी झाली होत. त्यानंतर सुपर ओव्हर घेण्यात आली, ज्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. दिल्लीच्या या विजयात मिचेल स्टार्कने मोलाची भूमिका बजावली.

IPL 2025 | Axar Patel - Mitchell Starc
DC vs RR Live: दिल्ली कॅपिटल्सचा 'सुपर' विजय; Mitchell Starc ने मॅच फिरवली, राजस्थान रॉयल्सच्या तोंडचा घास पळवला
Loading content, please wait...