PAK vs NZ: क्रिकेट सामन्यात पाऊस आला अन् प्रेक्षकांना डोक्यावर घ्याव्या लागल्या पिशव्या... पाकिस्तानातील Video व्हायरल

Rawalpindi Stadium: पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील रावळपिंडी येथे झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात प्रेक्षकांना वाईट सुविधांचा अनुभव आला आहे.
Pakistan vs New Zealand | Rawalpindi Stadium
Pakistan vs New Zealand | Rawalpindi StadiumEsakal

Pakistan vs New Zealand: न्यूझीलंड संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी२० मालिकेला गुरुवारी (१८ एप्रिल) सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्याच सामन्यात पावसाचा मोठा व्यत्यय आला. याचदरम्यानचे काही व्हिडिओ सध्या व्हायर होत आहे.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघातील टी२० मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियवर होणार होता. मात्र, या स्टेडियमवरील सुविधांबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कारण या सामन्यादरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला, मात्र यावेळी स्टेडियममधील स्टँड्सवर छतच नसल्याने प्रेक्षकांना पावसापासून रक्षण करण्यासाठी पॉलिथिन आणि प्लॅस्टिकच्या कागदांचा वापर केला. याबाबत काही सोशल मीडिया युजर्सनेही पोस्ट शेअर केल्या आहेत.

Pakistan vs New Zealand | Rawalpindi Stadium
IPL 2024 : इम्पॅक्ट खेळाडूचा नियम योग्य नाही,रोहित शर्मा ; आयपीएलमध्ये अष्टपैलू खेळाडूचे महत्त्व होतेय कमी

दरम्यान, या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर आधीच पावसामुळे नाणेफेकीला उशीर झाला होता. पण जवळपास अर्धा तास उशीरा झालेली नाणेफेक न्यूझीलंडने जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

नाणेफेकीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर बराच काळ पाऊस कोसळत असल्याने 3 तास प्रतिक्षा करावी लागली. यानंतर 5-5 षटकांच सामना घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Pakistan vs New Zealand | Rawalpindi Stadium
PBKS vs MI: कॅप्टन हार्दिककडे दुर्लक्ष करत मधवालने घेतला रोहितचा सल्ला? Video होतोय व्हायरल

न्यूझीलंडकडून टीम रॉबिन्सन आणि टीम सिफर्टने डावाची सुरुवात केली होती, तर पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदीने गोलंदाजीचा सुरुवात केली. विशेष म्हणजे दुसऱ्याच चेंडूवर आफ्रिदीने रॉबिन्सनला त्रिफळाचीत केले होते. मात्र, यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अखेर हा सामना 2 चेंडूचा खेळ झाल्यानंतर रद्द करण्यात आला.

आता पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना शनिवारी (20 एप्रिल) होणार आहे. हा सामना देखील रावळपिंडीलाच खेळवला जाणार आहे. दरम्यान, ही मालिका दोन्ही संघासाठी आगामी टी२० वर्ल्डकपच्यादृष्टीने महत्त्वाची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com