इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा केला रद्द, IPL संघांना झाला फायदा

England-IPL-Owners
England-IPL-Owners
Summary

न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही रद्द केला पाकिस्तान दौरा

IPL 2021: स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात काल बंगळुरूच्या संघाला कोलकाता संघाने पराभूत केले. एकतर्फी झालेल्या सामन्यात कोलकाताने १० षटके आणि ९ गडी राखून विराटसेनेचा पराभव केला. सर्व क्रिकेटप्रेमी या सामन्यात मग्न असताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धक्का दिला. पाकिस्तानमध्ये ऑक्टोबरमध्ये होणारा इंग्लंड दौरा ECB ने रद्द केला. सुरक्षेच्या मुद्द्यावर न्यूझीलंडने आपला दौरा रद्द केला. त्यानंतर इंग्लंडनेही दौरा रद्द केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं उघड आहे. पण, इंग्लंडच्या या निर्णयाचा अप्रत्यक्षपणे IPL संघांना मात्र फायदाच झाला.

England-IPL-Owners
IPL 2021: RCBच्या पराभवावर विराट काय म्हणाला? वाचा सविस्तर

इंग्लंड क्रिकेट बोर्डामुळे IPL संघांचा फायदा

भारतीय संघाने कोरोनाच्या भीतीने इंग्लंड दौरा अर्ध्यावर सोडला आणि सर्व खेळाडू IPL साठी युएईत दाखल झाले. त्यानंतर भारत आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. इंग्लंडच्या काही खेळाडूंनी IPL मधून माघारदेखील घेतली होती. आता इंग्लंडच्या पाकिस्तान दौरा रद्द करण्याच्या निर्णयाने IPLमध्ये सध्या खेळणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंना दुसऱ्या टप्प्यातील संपूर्ण सामने खेळता येतील अशी चिन्हे आहेत. पाकिस्तान दौऱ्यासाठी इंग्लंडचे काही खेळाडू प्ले ऑफ्सच्या सामन्यांना मुकणार होते. पण आता मात्र, इंग्लंडच्या खेळाडूंना पूर्ण IPL खेळता येऊ शकणार आहे. त्यामुळे याचा IPL संघांनाच फायदा झाला आहे.

England-IPL-Owners
IPL 2021: "म्हणून आम्ही हारलो"; पोलार्डची प्रामाणिक कबुली
England-IPL-Owners
Video: ब्राव्होची 'चॅम्पियन' खेळी; ८ चेंडूत कुटल्या २३ धावा

IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात सध्या खेळणारे इंग्लंडचे खेळाडू-

इयॉन मार्गन (कोलकाता), सॅम करन (चेन्नई), मोईन अली (चेन्नई), टॉम करन (दिल्ली), सॅम बिलिंग्स (दिल्ली), ख्रिस जॉर्डन (पंजाब किंग्स), जेसन रॉय (हैदराबाद), आदिल राशिद (पंजाब किंग्स), जॉर्ज गार्टन (बंगळुरू)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com