esakal | IPL 2021: RCBच्या पराभवावर विराट काय म्हणाला? वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

ABD-Bowled

विराटच्या RCB ला २० षटकात १०० धावाही करता आल्या नाहीत

IPL 2021: RCBच्या पराभवावर विराट काय म्हणाला? वाचा सविस्तर

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 KKR vs RCB: विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) १० षटके आणि ९ गडी राखून पराभूत केले. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना १९ षटकात केवळ ९२ धावा केल्या. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स यांसारखे बडे खेळाडू स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कोलकाताच्या संघाने केवळ एका गड्याच्या मोबदल्यात हा सामना खिशात घातला. पराभवानंतर विराटने आपल्या फलंदाजांवर नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: IPL 2021: RCB चा पराभव झाल्यानंतर 'असं' आहे Points Table!

"सुरूवात चांगली मिळाल्यानंतर आमच्या खेळाडूंकडून भागीदारीच्या अपेक्षा होती. आम्ही ४२ धावांवर १ बाद या धावसंख्येवर होतो. तेथून थेट २० धावांत आमचे ५ बळी बाद झाले. कदाचित दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच आम्हाला ही धोक्याची घंटा दिसली. जेणेकरून आम्ही यावर नीट काम करू. आम्ही आमच्या खराब कामगिरीबद्दल काही ना काही काही कारणं देऊ शकतो. पण त्याने काहीच होणार नाही. कारण अशी काहीतरी कारणं दिल्याने केवळ संघ पराभूत होतो", असं विराट म्हणाला.

Virat-Kohli

Virat-Kohli

हेही वाचा: Breaking: विराट कोहलीचा RCB च्या कर्णधारपदाचाही राजीनामा!

कोलकाताच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर वरूण चक्रवर्तीने सामना फिरवला. भारताकडून खेळताना त्याची भूमिका खूप महत्त्वाची असेल. नव्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंसोबत खेळता येतं ही मोठी गोष्ट आहे. आम्ही ८ पैकी ५ सामने जिंकलो आहोत. त्यामुळे एखाद्या सामन्यात हार-जीत होणं अपेक्षितच आहे. फक्त यापुढे खेळताना आम्ही अजून जास्त चांगली तयारी करू आणि सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न करत राहू", असा निर्धार विराटने व्यक्त केला.

loading image
go to top