
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला काही दिवसांचाच कालावधी राहिला असतानाच दिल्ली कॅपिटल्सला धक्का बसला. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२५ लिलावात ६.२५ कोटी रुपयांना आपल्या संघात घेतलेल्या हॅरी ब्रुकने अचानक या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
ब्रुकने आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये पूर्ण तयार राहण्यासाठी आयपीएल २०२५ मधून माघार घेतली आहे. आयपीएलमधून माघार घेण्याची ही त्याची दुसरी वेळ आहे. यापूर्वी गेल्यावर्षीही त्याने माघार घेतली होती. त्यामुळे आता त्याच्यावर बीसीसीआयच्या नियमानुसार २ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.