IPL 2024 : बटलरसह इंग्लंडच्या तीन खेळाडूंचा आयपीएलला टाटा, बाय-बाय; राजस्थान पाठोपाठ आरसीबीलाही बसला मोठा झटका

 Jos Buttler
England Players Jos Buttler Will Jacks Returning Home Leaving Ipl 2024 esakal

England Players Jos Buttler Will Jacks Returning Home Leaving Ipl 2024 : आयपीएल 2024 नंतर लगेचच टी 20 वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे सगळ्या देशांच्या संघांना त्यावर देखील फोकस करायचा आहे. याच कारणामुळे इंग्लंडचे प्रमुख खेळाडू आयपीएल अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले आहेत. इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर, विल जॅक्स आणि रीस टॉपली हे मायदेशी परतले आहेत. आरसीबीने बटलरच्या पाठवणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

 Jos Buttler
Punjab Kings: पंजाबचं आव्हान संपताच स्टार ऑलराऊंडरचा IPL 2024 स्पर्धेला गुडबाय; पोस्ट करत दिली माहिती

इंग्लंडचा संघ टी 20 वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानसोबत टी 20 मालिका देखील खेळणार आहे. सध्या पाकिस्तानचा संघ आयर्लंडविरूद्ध टी 20 मालिका खेळत आहे. ही मालिका वर्ल्डकपपूर्वीची तयारी म्हणून खेळवली जात आहे. त्यामुळे इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने आयपीएल खेळणाऱ्या आपल्या सर्व खेळाडूंना मायदेशी परतण्याचे आदेश दिले होते.

बटलरसह तीन खेळाडू रवाना

राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज जोस बटलर यापुढे आयपीएल 2024 मध्ये सहभागी होणार नाही. बटलर हा इंग्लंड संघाचा कर्णधार आहे. राजस्थान रॉयल्सने त्याच्या पुनरागमनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आघाडीचा फलंदाज विल जॅक आणि रीस टोपले हेही आपल्या देशात परतले आहेत. आरसीबीच्या सलग 5 विजयांमध्ये जॅकने बॅट आणि बॉल दोन्हीसह महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 Jos Buttler
KL Rahul : हे तर पेल्यातलं वादळ... केएल अन् गोयंका वादावर लखनौच्या कोचला नेमकं काय म्हणायचंय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com