Fans caught watching IPL match during live PSL game पाकिस्तान सुपर लीग आणि इंडियन प्रीमिअर लीग पहिल्यांदाच एकाच तारखांमध्ये होत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या यजमानपदामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB) यंदा PSL एप्रिलमध्ये खेळवण्यात आली. त्यामुळे दोन्ही देशांमधील चाहते, पत्रकार आमचीच लीग कशी चांगली, असा दावा करत सुटले आहेत. त्यात पाकिस्तानी पत्रकारांचा आत्मविश्वास किती आंधळा आहे, हे चित्र दाखवणारा प्रसंग समोर आला आहे. PSL ची मॅच पाहायला प्रेक्षक स्टेडियमवर गेला खरा, परंतु त्याचं मन IPL मध्येच अडकल्याचे दिसले. त्यावरुन पाकिस्तानला आता तरी त्यांची लायकी कळायला हवी...