Former Pakistan Cricketer Calls PSL a Domestic Event: इंडियन प्रीमिअर लीगचा दर्जा संपूर्ण जगाला माहित्येय.. या लीगमधून वर्षाला हजारो कोटींचा महसूल बीसीसीआय गोळा करते. जगभरातील मोठमोठे खेळाडू या लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात आणि अडीच महिन्यांच्या लीगसाठी त्यांना मिळणारं मानधनही बक्कळ असतं.. तरीही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) सतत पाकिस्तान सुपर लीगची ( PSL) आयपीएलसोबत तुलना करताना दिसतात. त्यामुळेच सोशल मीडियावर IPL vs PSL असा वादही रंगताना दिसतो. पण, आता त्यांच्याच गालावर चपराक बसेल, अशी बातमी समोर आली आहे.