Harshal Patel’s struggle deserves respect : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सला चेपॉकवर पराभूत केले. चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ १५४ धावांवर माघारी पाठवल्यानंतर SRH ने १८.४ षटकांत ५ गडींच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. हर्षल पटेलने २८ धावांत ४ विकेट्स घेऊन प्लेअर ऑफ दी मॅचचा मान मिळवला. पण, या सामन्यात SRH ची मालकीण काव्या मारन ( Kavya Maran) त्याच्यावर चिडलेली दिसली. हर्षलकडून एक सोपा झेल टाकला गेला आणि ते पाहून काव्याला प्रचंड राग आला होता. पण, काव्याला हर्षलचा इथपर्यंतचा स्ट्रगल कदाचित माहीत नाही.