
केकेआरच्या पराभवानंतर गंभीरचे धडाकेबाज सेलिब्रेशन : पाहा व्हिडिओ
कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपरजायंट्स (LSG) यांच्यात बुधवारी झालेल्या सामना नख खायला लावणारा होता. शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या या सामन्यात केकेआरला 2 धावांनी पराभव करून लखनौने प्लेऑफचे तिकीट जिंकले. केकेआरच्या पराभवानंतर लखनौ सुपरजायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरची रिअक्शन पाहण्यासारखी होती. गौतम गंभीर हा एकमेव व्यक्ती आहे ज्याच्या नेतृत्वाखाली केकेआरने दोनदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. (Gautam Gambhir Reaction Heartbreak kkr)
गौतम गंभीरची ही रिअक्शन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. केकेआरला शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती. डगआऊट मध्ये गौतम गंभीर डोळे मिटुन बसला होता. पण डोळे उघडताच ते दृश्य पाहण्यासारखे होते. मार्कस स्टॉइनिसने उमेश यादवला क्लीन बोल्ड करून संघाला विजय मिळवून दिला. त्याचवेळी लखनौने सामना जिंकला गौतम गंभीर खुर्चीवर उभा राहून उडी मारत होता.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, लखनौच्या कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डी कॉक नाबाद 140 आणि केएल राहुल नाबाद 68, लखनौ संघाने 20 षटकात 210 धावा केल्या. या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना KKR संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून 208 धावाच करता आल्या आणि सामना 2 धावांनी पराभव झाला.