Gautam Gambhir: 'KKR मध्ये सूर्यकुमारच्या क्षमतेचा योग्य वापर...', गौतम गंभीरने बोलून दाखवलं मनातलं दु:ख

Gautam Gambhir on Suryakumar Yadav: गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार असताना या संघाकडून सूर्यकुमार यादवही खेळायचा. त्यादिवसांबद्दल गंभीर नुकताच व्यक्त झाला आहे.
Gautam Gambhir Suryakumar Yadav
Gautam Gambhir Suryakumar YadavSakal

Gautam Gambhir on Suryakumar Yadav: कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी आयपीएल 2024 स्पर्धेच्या प्लेऑफमध्येही स्थान मिळवण्यात यश मिळवले. दरम्यान, यंदा कोलकाता संघ गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे.

गंभीर कोलकाताचा माजी कर्णधारही आहे. त्याच्या नेतृत्वात कोलकाताने 2012 आणि 2014 मध्ये आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते. दरम्यान आता पुन्हा गंभीार कोलकाताशी जोडला गेला आहे, पण तो आता मार्गदर्शकाच्या (Mentor) भूमिकेत दिसत आहे.

दरम्यान, नुकतेच त्याने त्याच्या नेतृत्वाच्या काळातील सर्वाधिक पश्चाताप होणाऱ्या गोष्टीबद्दल खुलासा केला आहे. त्याने म्हटले की सूर्यकुमार यादवच्या क्षमतेचा योग्य वापर न करता आल्याचा खेद आहे. सूर्यकुमार 2014 ते 2017 दरम्यान कोलकाता संघाकडून खेळला होता. त्यावेळी गंभीर कोलकाताचा कर्णधारही होता.

Gautam Gambhir Suryakumar Yadav
MS Dhoni : 'धोनी हा चेन्नईचा देव, लवकरच त्याच्या नावावर मंदिरे बांधली...' CSKच्या माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य

कोलकाताकडून सूर्यकुमार खालच्या क्रमांकांवर खेळताना बऱ्याचदा दिसायचा. त्याने कोलकाताकडून 54 सामन्यांत 608 धावा केल्या. त्याला 2018 आयपीएलपूर्वी सूर्यकुमारला कोलकाताने करारमुक्त केले, त्यानंतर मुंबईने त्याला संघात पुन्हा घेतले. सूर्यकुमार 2012 आणि 2013 मध्येही मुंबईकडून खेळला होता.

सूर्यकुमारबद्दल गंभीर स्पोर्ट्सकिडाशी बोलताना म्हणाला, 'एक कर्णधार म्हणून खेळाडूची सर्वोत्तम क्षमता ओळखणे आणि ती जगाला दाखवणे ही भूमिका असते. मला जर सात वर्षांच्या नेतृत्वात कशाचा सर्वाधिक पश्चाताप असेल, तर सूर्यकुमार यादवच्या क्षमतेनुसार त्याचा सर्वोत्तम उपयोग मी करू शकलो नाही. त्याचे कारण संघाचे संयोजन होते.

'तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर केवळ एका खेळाडूला खेळवू शकता. एक कर्णधार म्हणून तुम्हाला प्लेइंग इलेव्हनमधील इतर 10 खेळाडूंबद्दलही विचार करायचा असतो. तो तिसऱ्या क्रमांकावर अधिक प्रभावी ठरला असता, पण तो 7 व्या क्रमांकावरही चांगला खेळला.'

Gautam Gambhir Suryakumar Yadav
IPL 2024: 'याचं वेगळंच क्रिकेट सुरू...', सिराजच्या बोलण्याची विराटनं उडवली खिल्ली, RCB च्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल

गंभीरने पुढे असेही म्हटले की सूर्यकुमार एक टीम प्लेअर आहे. त्याला त्यामुळेच 2015 मध्ये उपकर्णधारही बनवण्यात आले होते. गंभीर म्हणाला, 'तो एक टीम प्लेअरही होता. कोणीही एक चांगला खेळाडू बनू शकतो, पण एक टीम प्लेअर बनणे कठीण आहे.'

'त्याला तुम्ही 6 व्या किंवा 7 व्या क्रमांकावर खेळवा किंवा बेंचवर बसवा, तरी तो नेहमी हसतमुख असायचा आणि संघासाठी योगदान देण्यात नेहमीच तयार असायचा. म्हणूनच आम्ही त्याला उपकर्णधार म्हणूनही नियुक्त केले होते.'

दरम्यान, 2018 मध्ये मुंबई संघात परतल्यानंतर सूर्यकुमारची कामगिरीही उंचावलेली दिसली. इतकेच नाही, तर त्याने भारतीय संघातही स्थान मिळवले आणि सध्या तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com