
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारी(१९ एप्रिल) दोन सामने खेळवले जात आहेत. दुपारचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात अहमदाबादला होत आहे. पण सध्या भारतात उष्णता मोठ्याप्रमाणात वाढली आहे.
हा सामनाही भर दुपारी ३.३० वाजता सुरू झाला आहे. यावेळी साधारण तापमान ४० डिग्रीच्या आसपास आहे. अशातच खेळाडूंना उन्हाचा त्रास होण्याची शक्यता वाढली आहे. इशांत शर्माबाबतही अशीच घटना घडल्याचे दिसले.