
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ३५ वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. शनिवारी (१९ एप्रिल) डबल हेडर असल्याने दोन सामने खेळवण्यात येत आहे. त्यातील हा पहिला सामना आहे.
या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला आहे.