GT vs KKR : रिंकू सिंहचा शेवटच्या षटकात धमाका; केकेआरने शेवटच्या चेंडूवर मिळवला विजय

गुजरातची कोलकाता नाईट रायडर्सशी आज अहमदाबादमध्ये लढत
IPL 2023 GT vs KKR Live
IPL 2023 GT vs KKR Liveesakal

IPL 2023 GT vs KKR Live : गुजरात टायटन्सने विजयासाठी ठेवलेल्या 205 धावांचा पाठलाग करताना केकेआरने झुंजार खेळ करत सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. केकेआरचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंहने शेवटच्या षटकात विजयासाठी 29 धावांची गरज होती त्यावेळी सलग पाच षटकार मारत सामना जिंकून दिला. रिंकूने 21 चेंडूत नाबाद 48 धावा चोपल्या. तर व्यंकटेश अय्यरने देखील 82 धावांची झुंजार खेळी केली.

तत्पूर्वी, गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या राशिद खानचा हा निर्णय गुजरातच्या फलंदाजांनी योग्य ठरवला.

मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज साई सुदर्शनने 38 चेंडूत 53 धावा ठोकल्या. तर विजय शंकरने स्लॉग ओव्हरमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत 21 चेंडूत अर्धशतक ठोकण्याची किमया केली. त्याने 24 चेंडूत केलेल्या नाबाद 63 धावांच्या जोरावर गुजरातने 20 षटकात 4 बाद 204 धावा केल्या. या खेळीत विजय शंकरने 5 षटकार आणि 4 चौकार मारले.

राशिद खानची हॅट्ट्रिक अन् केकेआरच्या हातून सामना निसटला.

82 धावांची खेळी करणाऱ्या अय्यरने गुजरातचा बीपी वाढवला होता. मात्र नितीश राणाला बाद करणाऱ्या अल्झारी जोसेफने अय्यरचा अडसर दूर केला. पाठोपाठ कर्णधार राशिद खानने 17 व्या षटकात पहिल्या चेंडूवर आंद्रे रसेल, दुसऱ्या चेंडूवर सुनिल नरेन आणि तिसऱ्या चेंडूवर शार्दुल ठाकूरला बाद करत हॅट्ट्रिकसह केकेआरचे पॉवर हाऊस निकामी केले.

86-2 (10 Ov) : व्यंकटेश अय्यर नितीश राणाची झुंजार फलंदाजी

गुजरातचे 205 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात खराब झाली. रेहमनुल्ला गुरबाज 15 तर एस जगदीशन 5 धावांची भर घालून परतला. मात्र त्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा यांनी केकेआरचा डाव सावरत संघाला 10 षटकात 86 धावांपर्यंत पोहचवले.

विजय शंकरची तडाखेबाज खेळी

थ्रिडी प्लेअर म्हणून ओळख असलेल्या विजय शंकरने केकेआर विरूद्ध 24 चेंडूत तडाखेबाज 63 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने केकेआरसमोर 204 धावांचा डोंगर उभारला.

GT 147/3 (16.2) : सुदर्शनचा अर्धशतकी धमाका 

गुजरात टायट्नसचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज साई सुदर्शनने 35 चेंडूत नाबाद अर्धशतकी खेळी करत गुजरात टायटन्सला 17 षटकात 150 चा टप्पा पारू करून दिला.

100-2 : शुभमन गिल बाद 

शुभमन गिलने 31 चेंडूत 39 धावा केल्यानंतर त्याला सुनिल नरेनने बाद करत गुजरातला दुसरा धक्का दिला. गिल बाद होण्यापूर्वी त्याने सुदर्शनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी रचली होती.

91 - 1 : गुजरातची होम ग्राऊंडवर दमदार सुरूवात 

गुजरातने केकेआरविरूद्धच्या सामन्यात आपला पहिला सलामीवीर वृद्धीमान साहा 17 धावांवर गमावला. त्यानंतर मात्र गुजरात टायटन्सने दमदार फलंदाजी करत 11 षटकात 91 धावा केल्या.

GT vs KKR Live: गुजरातने नाणेफेक जिंकून कोलकाताविरुद्ध घेतला हा निर्णय

गुजरात टायटन्सचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संघाचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या हा सामना खेळत नाहीये. त्यांची प्रकृती ठीक नाही. गुजरात संघात एक बदल करण्यात आला आहे. हार्दिक पांड्याच्या जागी विजय शंकरचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोलकाता संघात दोन बदल करण्यात आले आहेत. टीम साऊथीसाठी लॉकी फर्ग्युसन आणि मनदीप सिंगसाठी नारायण जगदीसन आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com