
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत गुजरात टायटन्सची कामगिरी चांगली होत आहे. त्यांनी सातत्याने पहिल्या ४ संघांमध्ये स्थान टिकवून ठेवले आहे. त्यांनी पहिल्या पाच सामन्यात ४ विजय मिळवले आहेत. पण असे असतानाच त्यांना काही मोठे धक्के बसले आहेत.
त्यांच्या संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा काही दिवसांपूर्वीच वैयक्तिक कारणामुळे अचानक घरी परतला होता. त्यानंतर आता संघातील अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स देखील घरी परतला असून यामागील कारणही समोर आले आहे.