
भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तो भारताच्या कसोटी संघाचा कर्णधारही होता. पण आता त्याच्या निवृत्तीनंतर भारताचा पुढचा कसोटी कर्णधार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामध्ये शुभमन गिलचे नाव आघाडीवर आहे.
सध्या गिलला भारताचा कसोटी कर्णधार बनवले जाण्याची चर्चा जोरदार सुरू आहे. याबाबत अनेकांनी प्रतिक्रियाही दिली आहे. काहींच्या मते हा योग्य निर्णय आहे, तर काहींच्या मते हा निर्णय चुकीचा आहे.
पण आता यावर गिल आयपीएलमध्ये कर्णधार असलेल्या गुजरात टायटन्सच्या सहाय्यक प्रशिक्षक आशिष कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना त्याला एमएस धोनीचा संदर्भही जोडला आहे.