GT vs CSK : ऋतुराज नाणेफेक हरलेलाच बरा... गुजरातच्या विजयानं चेन्नईचं वाढलं टेन्शन

GT vs CSK
GT vs CSK esakal

Gujarat Titans Defeat Chennai Super Kings Point table Play Off Equation IPL 2024 : ऋतुराज अन् नाणेफेकीचं तसं वावडं आहे. सलग टॉसचं हरण्यात ऋतुराजचा हात कोण धरत नाही. मात्र गुजरातविरूद्धच्या सामन्यात या पठ्ठ्यानं टॉस जिंकला. त्यानंतर त्यानं चेस करण्याचा निर्णय देखील घेतला. परंतु सामना जसजसा पुढं सरकत होता. ऋतुराजच्या निर्णयावर चाहत्यांना पश्चाताप होत होता. ऋतू टॉस हरलेलाच बरा असं वाटू लागलं.

GT vs CSK
Sai Sudarshan GT vs CSK : साई सुदर्शनने केला मोठा विक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागं

पॉवर प्लेमध्ये गुजरातचा कर्णधार भलताच फॉर्ममध्ये दिला. त्यानं सीएसकेच्या बॉलर्सची धुलाई सुरू केली. दुसरीकडं साई सुदर्शन मात्र निवांत खेळत होता. पॉवर प्लेनंतर मात्र साई सुदर्शननं आपला गिअर बदलला. या जोडीनं बघता बघता शतकी भागीदारी रचली. सीएसकेचे बॉलर आता विकेट काढतील मग विकेट काढती अशी प्रतिक्षा चाहते करत होते. मात्र साई अन् शुभमन आऊट होण्याचं काही नाव घेत नव्हती.

अर्धशतकी मजल मारल्यानंतर साई अन् गिलच्यात एक कॉम्पिटिशन सुरू झालं. सर्वात आधी शतक ठोकण्यासाठी हे दोघं सीएसकेच्या बॉलर्सच्या मागं हात धुवून लागली. 80 च्या घरात पोहचेपर्यंत साई या शर्यतीत आघाडीवर होता. मात्र गिलनं जोरदार मुसंडी मारली अन् त्याच्या आधी शतकी मजल मारली.

साईनं देखील त्यानंतर लगेच शतक ठोकलं अन् आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या ओपनिंग पॅर्टनरशिपच्या विक्रमाशी बरोबरी केली. या सगळ्या प्रोसेसमध्ये सीएसकेचे बॉलर नन्हा बालकच भासत होते. त्यात तुषार देशपांडेने गिलला जीवनदान दिलं. असं वाटू लागलं की सीएसके आज विकेटलेस राहणार.

मात्र तुषार देशपांडेनं आपली चूक सुधारली अन् 18 व्या षटकात आधी साई सुदर्शनला अन् त्यानंतर गिलला बाद केलं. गुजरातनं चेन्नईसमोर 232 धावांचं आव्हान ठेवलं.

GT vs CSK
Rahul Dravid India coach : राहुल द्रविडनंतर कोण होणार टीम इंडियाचा कोच...? बीसीसीआयसमोर आहेत 'ही' तगडी नावं

यंदाच्या आयपीएलमध्ये 250 चं टार्गेट देखील छोटं वाटतं. हीच आशा मनात धरून सीएसके धडाकेबाज सुरूवात करेल अन् सामना जिंकेल ही चाहत्यांची भाबडी आशा होती. हा आशा कशी भाबडी आहे हे सीएसकेनं पॉवर प्लेमध्येच सिद्ध करून दाखवलं. त्यांचे तीन शिलेदार तीन ओव्हरमध्ये 10 धावा करत पॅव्हेलिनयमध्ये पोहचले. सीएसकेनं तिथंच सामना हरला होता.

मात्र डॅरेल मिचेल अ्न मोईन अलीनं फाईट करायचं ठरवलं. दोघांनी 109 धावांची शतकी पार्टनरशिप केली. मात्र मोहित शर्मा नावाच्या अस्त्रानं आपला जवला दाखवला अन् मिचेलला 68 रन्सवर अन् मोईन अलीला 56 धावांवर बाद केलं.

त्यानंतर आलेल्या शिवम दुबेनं आल्या आल्या फटकेबाजी करत हरलेला सामना जिंकून देण्यासाठी जोर लावला मात्र हा जोर 13 बॉलमध्ये 21 रन्समध्येच ओसरला. तोही मोहितची शिकार झाला.

जडेजा अन् धोनी अशक्यही शक्य करून दाखवतील असं सीएसकेचे फॅन्स मनोमनी म्हणत होते. मात्र आता परिस्थिती हाताबाहेर गेली होती. राशिदनं जडेजाची शिकार केली. धोनीनं मात्र 3 सिक्स अन् एक बाऊंड्री मारत आपलं मनोरंजनाचं काम केलं. सीएसकेच्या चाहत्यांना पराभवाच्या दु:खात धोनीच्या या 26 धावांच्या खेळीचाच काय तो आधार!

धोनीच्या खेळीनं मन जिंकलं मात्र सीएसके हरल्यानं प्ले ऑफचं गणित अवघड झालं. कारण दिल्ली अन् लखनौ सीएसकेला प्ले ऑफमधून बाहेर काढण्यासाठी टपून बसलेत आता दोन पैकी दोन्ही सामने जिंकावे लागणार!

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com