PBKS vs GT : स्मिथचा आगाऊपणा पंजाबला नडला; तेवतियला मिळाली नामी संधी | Gujarat Titans Defeat Punjab Kings Odean Smith One Mistake | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Titans Defeat Punjab Kings Odean Smith One Mistake Rahul Tewatia capitalize Victory

PBKS vs GT : स्मिथचा आगाऊपणा पंजाबला नडला; तेवतियला मिळाली नामी संधी

मुंबई : दोन चेंडू दोन षटकार मारत राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) गेलेला सामना परत आणला. अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पंजाब किंग्जचा 6 विकेट्सनी पराभव केला. राहुल तेवतियाने शेवटच्या चेंडूवर षटकार मरात सामना जिंकून दिला. ओडेन स्मिथने (Odean Smith) अखेरच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अनावश्यक थ्रो केला. त्यामुळे गुजरातच्या मिलर आणि तेवतियाला एक अतिरिक्त धाव मिळाली. त्यामुळे गुजरातला टार्गेट 2 चेंडूत 13 धावांच्या ऐवजी 12 धावा असे मिळाले. विशेष म्हणजे या ओव्हर थ्रोमुळे तेवतिया स्ट्राईकवर आला आणि त्याने दोन चेंडूत दोन षटकार मारत सामना जिंकून दिला. गुजरातकडून शुभमन गिलने 96 धावांची जबरदस्त खेळी केली. तर पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनने 35 धावांची खेळी करून त्याला चांगली साथ दिली.

पंजाबचे विजयासाठीचे 190 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरातने दमदार सुरुवात केली. सलामीवीर शुभमन गिलने पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलत फटकेबाजी केली. त्याने मॅथ्यू वेड बरोबर 20 चेंडूत 32 धावांची सलामी दिली. त्यानंतर रबाडाने मॅथ्यू वेडला 6 धावांवर बाद करत गुजरातला पहिला धक्का दिला.

हेही वाचा: PBKS vs GT : पुन्हा तेवतिया शो! ओडिस स्मिथची एक चूक पडली महागात

मात्र त्यानंतर पदार्पण करणारा साई सुदर्शन बॅटिंग करण्यास आला. या डावखुऱ्या फलंदाजाने शुभमन गिलला चांगली साथ दिली. दरम्यान, गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने सुदर्शन देखील मिळालेला चेंडू सीमापार धाडत स्कोअरबोर्ड हलता ठेवत होता. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 68 चेंडूत 101 धावांची भागीदारी केली. मात्र राहुल चाहरने साई सुदर्शनला 35 धावांवर बाद करत गुजरातला दुसरा धक्का दिला. साई सुदर्शन बाद झाल्यानंतर गुजरातची धावगती थोडी मंदावली. मात्र त्यानंतर हार्दिक पांड्या आणि गिलने आक्रमक फटके मारत सामना जवळ आणण्याचा प्रयत्न केला.

या दोघांनी सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. मात्र त्यावेळी गुजरातला 6 चेंडूत 19 धावांची गरज होती. त्यात शुभमन गिल देखील 96 धावांवर बाद झाला होता. दरम्यान हार्दिक पांड्या 18 चेंडूत 27 धावा करून धावबाद झाला. त्यानंतर शेवटच्या दोन चेंडूपर्यंत सामना पंजाबच्या हातात होता. मात्र गुजरातला ज्यावेळी 2 चेंडूत विजयासाठी 12 धावांची गरज होती त्यावेळी राहुल तेवतियाने षटकार मरात सामना 1 चेंडूत 6 धावा असा आणला. तेवतियाने अखेरच्या चेंडूवर देखील षटकार मारत गुजरातच्या विजयाची हॅट्ट्रिक केली.

हेही वाचा: धवन चौकारांच्या 'शिखरा'वर; ही 'हजारी' रोहित-विराटलाही नाही जमली

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत पंजाब किंग्जला पॉवर प्लेमध्येच धक्के देण्यास सुरूवात केली. त्यांनी मयांक अग्रवाल आणि जॉनी बेअरस्टोला स्वस्तात बाद केले. नवीन चेंडू टाकणाऱ्या हार्दिकने पुन्हा एकदा पॉवर प्लेमध्ये मयांक अग्रवाल सारखी मोठी विकेट काढून दिली. त्यानंतर हंगामातील पहिलाच सामना खेळणारा बेअरस्टोला लोकी फर्ग्युसनने बाद केले.

मात्र त्यानंतर शिखर धवन आणि लिम लिव्हिंगस्टोनने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. ही जोडी जमते असे वाटत असतानाच राशिद खानने शिखर धवनला (35) बाद करत मोठा धक्का दिला. त्यानंतर लिव्हिंगस्टोनने तुफान फटकेबाजी सुरू केली. यामुळे संघाचे शतक धावफलकावर लागले. मात्र दुसऱ्या बाजूने इतर फलंदाज बेजबाबदार फटके मारून बाद होत होते. जितेश शर्मा आणि ओडिन स्मिथ पाठोपाठच्या चेंडूवर बाद झाले. त्यांना पदार्पण करणाऱ्या दर्शन नाळकांडे बाद केले.

दरम्यान, पंजाबच्या बॅटिंगची जबाबदारी एकहाती सांभळलेला लिव्हिंगस्टोन देखील 64 धावांची खेळी करून बाद झाला. शाहरूख खानने देखील दोन षटकार मारून पुन्हा निराशा केली. गुजरातकडून राशिद खानने भेदक मारा करत 3 तर दर्शन नाळकांडेने 2 विकेट घेतल्या. अखेर राहुल चाहने 14 चेंडूत 22 धावांची खेळी करत पंजाबला 189 धावांपर्यंत पोहचवले.

Web Title: Gujarat Titans Defeat Punjab Kings Odean Smith One Mistake Rahul Tewatia Capitalize Victory

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top