GujaratTitans vs RajasthanRoyals : राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल साखळी फेरीत निर्णायक सामना रंगणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघ प्ले ऑफच्या दिशेने वाटचाल करत आहे, तर राजस्थानसमोर नवे आव्हान आहे.
जयपूर : राजस्थान रॉयल्स-गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आज आयपीएलचा साखळी फेरीचा सामना रंगणार आहे. गुजरातच्या संघाने आतापर्यंत आठ लढतींमधून सहा लढतींमध्ये विजय मिळवले असून त्यांचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या दिशेने सरसावला आहे.