IPL 2022: हंगाम सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन्सला तगडा झटका

Gujarat Titans got big blow after Opener Jason Roy Withdraw
Gujarat Titans got big blow after Opener Jason Roy Withdraw esakal

नवी दिल्ली: आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 2022) 26 मार्चपासून सुरू होत आहे. याबाबतची जोरदार तयारी आयोजक करत आहेत. गेल्या महिन्यात आयपीएलचा मेगा लिलाव (IPL 2022 Auction) देखील झाला होता. त्यात आधीच्या 8 आणि नवे 2 अशा एकूण 10 संघांनी आपली संघबांधणी केली. नव्या दोन संघात गुजरात टायटन्स (Gujarat Titans)आणि लखनौ सुपर जायंट या संघांचा समावेश आहे. गुजरात टायटन्सने आयपीएल लिलावात चांगली खरेदी केली होती. मात्र हंगाम सुरू होण्यापूर्वीच त्यांना एक तगडा झटका बसला आहे. इंग्लंडचा (England Player) धडाकेबाज फलंदाज जेसन रॉयने (Jason Roy) आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याला गुजरात टायटन्सने 2 कोटीला खरेदी केले होते.

Gujarat Titans got big blow after Opener Jason Roy Withdraw
श्रेयस म्हणतो टी 20 मध्ये असं करणे म्हणजे गुन्हाच!

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार जेसन रॉयने (Jason Roy) गेल्या आठवड्यातच फ्रेंचायजीला आपला निर्णय कळवला होता. गुजरात टायटन्सने जेसन रॉयचा बदली खेळाडू अजून घेतलेला नाही. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या मात्र इंग्लंडकडून खेळणाऱ्या जेसन रॉयला गुजरात टायटन्सने बेस प्राईस 2 कोटीला खरेदी केले होते. गुजरात टायटन्सने शुभमन गिल सोबत जेसन रॉय हा एकटाच सलामीवीर (Opening Batsmen) संघात सामील केला होता. आता त्यानेच माघार घेतल्याने गुजरातला तगडा झटका बसला आहे.

Gujarat Titans got big blow after Opener Jason Roy Withdraw
मुंबईचा मोहिते सलग 50 तास करतोय बॅटिंग; रडावर आहेत 72 तास

जेसन रॉयने आयपीएल 2022 मधून माघार घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने 2020 च्या आयपीएल हंगामातून देखील माघार घेतली होती. यावेळी त्याने वैयक्तीक कारण दिले होते. त्याला दिल्ली कॅपिटल्सने 1.5 कोटी रूपयाला खरेदी केले होते. यंदाच्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) तो क्वेट्टा ग्लँडिएटर्सकडून खेळत होता. त्याने फ्रेंचायजीकडून फक्त 6 सामने खेळले होते. त्यात त्याने 50.50 च्या सरासरीने 303 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्रईक रेट 170.22 होता. जानेवारी महिन्यात रॉयला दुसरे मुल झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com