Parthiv Patel: अखेरीपर्यंत लढलो, पण पिच कठीण ठरली; पार्थिव पटेलांची पराभवानंतर प्रतिक्रिया
Challenging Pitch Costs Gujarat Titans the Match: आव्हानात्मक खेळपट्टीमुळे गुजरातला पंजाबविरुद्ध पराभव पत्करावा लागला, असे पार्थिव पटेल यांनी सांगितले. रिव्हर्स स्विंग आणि संथ पिचमुळे फलंदाजी कठीण ठरली.
मुल्लानपूर : खेळपट्टी फलंदाजीस आव्हानात्मक होती आणि याच प्रमुख कारणामुळे आयपीएलमधील पंजाबविरुद्धच्या सामन्यात आम्हाला विजय मिळवता आला नाही, अशी कारणमीमांसा गुजरात संघाचे सहाय्यक प्रशिक्षक पार्थिव पटेल यांनी केली.