IPL 2024 Angkrish : अभिषेक यांना खेळी अर्पण ,अंगक्रिश ; कोलकता संघातील गुरू-शिष्याचे मुंबई कनेक्शन

भारतीय युवक संघाने २०२२ मध्ये मिळवलेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक २७८ धावा करणाऱ्या अंगक्रिश रघुवंशीने आयपीएलमध्ये प्रथमच फलंदाजीची संधी मिळताच त्याचे सोने केले आणि आपल्या प्रगतीत गुरू अभिषेक नायर यांचे सर्वात मोठे योगदान असल्याचे सांगितले.
IPL 2024 Angkrish
IPL 2024 Angkrishsakal

विशाखापट्टणम्‌ : भारतीय युवक संघाने २०२२ मध्ये मिळवलेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक २७८ धावा करणाऱ्या अंगक्रिश रघुवंशीने आयपीएलमध्ये प्रथमच फलंदाजीची संधी मिळताच त्याचे सोने केले आणि आपल्या प्रगतीत गुरू अभिषेक नायर यांचे सर्वात मोठे योगदान असल्याचे सांगितले.

अंगक्रिश हा मूळचा दिल्लीचा; परंतु वयाच्या ११ वर्षी क्रिकेट खेळण्यासाठी मायानगरीत आला आणि मुंबईकर झाला. मुंबईचे माजी खेळाडू अभिषेक नायर हे कोलकता नाईट रायडर्स संघाचे गेल्या अनेक वर्षांपासून सहायक प्रशिक्षक आहेत. अंगक्रिशसाठी त्यांनी अगोदरपासून मेहनत घेतलेली आहे आणि आयपीएलमध्येही तेच त्याला कोलकता संघात घेऊन आले. बुधवारी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या अंगक्रिशने २७ चेंडूत ५४ धावांची शानदार खेळी साकार केली आणि सर्वांचे लक्ष वेधले.

अंगक्रिश अभिषेक नायर यांच्या तालमीत तयार झाला आहे. आपल्या या वाटचालीत गुरू अभिषेक यांचा सर्वात मोठा वाटा आहे, असे अंगक्रिशने दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर सांगितले. आपली ही खेळीही त्याने नायर यांना अर्पण केली.

IPL 2024 Angkrish
IPL 2024 GT vs PBKS : शशांक सिंगचे झुंजार अर्धशतक, पंजाबने गुजरातचा विजयी घास हिरावला

गुरू अभिषेक माझ्यासाठी सर्वस्व आहेत. माझा खेळ, माझा विचार, खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याचे सर्व धडे मला अभिषेक यांनी दिले आहे. ते माझे गुरू आहेत, असे तो आवर्जून सांगतो. अभिषेक नायर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून देशातर्गत आणि फ्रँचाईसी क्रिकेटमध्ये निष्णांत प्रशिक्षक अशी आपली ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या मोसमानंतर आयपीएलमधून निवृत्त होत असलेला दिनेश कार्तिकनेही अभिषेक यांच्याकडे गेल्या काही वर्षांपासून मार्गदर्शन घेत आहे. मुळात हे दोघेही एकाच वयोगटातील आहेत; पण त्यांच्यामधील नाते गुरू-शिष्याचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com