Hardik Pandya: सुमार क्षेत्ररक्षणाचा फटका, हार्दिक पंड्या; कोलकताविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराची कबुली

Hardik Pandya Blames Poor Fielding: कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सच्या खराब क्षेत्ररक्षणावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. झेल सोडल्यामुळे सामन्याचं चित्र बदलल्याचं मान्य करत त्याने संघाच्या चुका उघडपणे कबूल केल्या.
Hardik Pandya

Hardik Pandya

esakal

Updated on

कोलकता : कोलकता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल लढतीत मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने सुमार क्षेत्ररक्षणाचा फटका बसला असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. यंदाच्या आयपीएल मोसमात आमच्याकडून क्षेत्ररक्षणात चुका झाल्या. अनेक झेल सोडण्यात आले. ही बाब लपवण्यासारखी नाही. झेल सोडल्यानंतर सामन्याला कलाटणी मिळू शकते. झेल सोडल्यानंतर संघ बॅकफूटवर फेकला जातो. या मोसमात आमच्याकडून क्षेत्ररक्षणात वारंवार चुका करण्यात येत होत्या. याचा विपरीत परिणामही मैदानात दिसून आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com