Hardik Pandya IPL 2024 : रोहितच्या कॅप्टन्सीच्या प्रश्नावर हार्दिकचे राक्षसी हास्य! प्रशिक्षक मार्क बाऊचरचाही Video व्हायरल

Hardik Pandya
Hardik Pandya ESAKAL

Hardik Pandya Press Conference : मुंबई इंडियन्सने आज आयपीएल 2024 च्या पार्श्वभूमीवर एक पत्रकार परिषद घेतली. मुंबई इंडियन्समधील कॅप्टन्सी बदलानंतर पहिल्यांदाच हार्दिक पांड्या पत्राकारांना सामोरा गेला. यावेळी त्याच्यासोबत मार्क बाऊचर देखील होता. यावेळी पत्रकारांनी हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी बदलाबाबत आणि रोहित शर्माबाबत प्रश्न विचारले. त्यावेळी या दोघांनी उत्तर देणं टाळलं. या प्रश्नावर या दोघांच्या चेहऱ्यावर असलेल्या हाभावाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Hardik Pandya
Live मॅचमध्ये घडली मोठी घटना! एकाच सामन्यात 4 खेळाडू जखमी, एकजण थेट पोहचला हॉस्पिटलमध्ये...

मुंबई इंडियन्सने पत्रकार परिषद घेतली त्यात कर्णधार हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक मार्क बाऊचर हे दोघे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होती. मात्र एका पत्रकाराने हार्दिकला तू मुंबई इंडियन्ससोबत करार करतानाच कर्णधारपदाची अट घातली होतीस अशी चर्चा आहे असा प्रश्न विचारला. यावेळी मुंबईच्या मीडिया मॅनेजरने या प्रश्नाला बगल दिली. हार्दिकने देखील आपल्या तोंडाला चिकटपट्टी लावली होती.

त्यानंतर लगेचच दुसऱ्या पत्रकाराने मार्क बाऊचरला मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून काढून टाकताना कोणता विचार केला होता असा प्रश्न विचारला. त्यावर देखील मार्क बाऊचरने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. या दोन्ही प्रश्नांवर कर्णधार हार्दिकची आणि प्रशिक्षक मार्क बाऊचरची देहबोली पाहण्यासारखी होती.

हार्दिक या प्रश्नावर कुत्सितपणे हासताना दिसला. तर बाऊचरला हा प्रश्न आवडला नसल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते.

Hardik Pandya
Wrestling News WFI : इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने कुस्ती महासंघाची अ‍ॅड हॉक समिती केली विसर्जित

दरम्यान, मुंबई इंडियन्सचे चाहते हे रोहित शर्मा संघात कधी दाखल होणार याची वाट पाहत आहेत. त्यांना रोहितने खुशखबरी दिली आहे. रोहित आजच मुंबई इंडियन्सच्या कळपास सामील झाला आहे.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com