PBKS vs MI: आशुतोषने थोडं टेन्शन दिलं होतं.. निसटत्या विजयानंतर हार्दिकने केलं पंजाबच्या पठ्ठ्याचं कौतुक

PBKS vs MI, IPL 2024: पंजाब किंग्सविरुद्धच्या मुंबई इंडियन्सच्या थरारक विजयानंतर हार्दिकने या सामन्यात आशुतोष शर्माने टेंशन दिलेलं हे मान्य केलं आहे.
Ashutosh Sharma | Hardik Pandya | IPL 2024
Ashutosh Sharma | Hardik Pandya | IPL 2024Sakal

Hardik Pandya News: मुंबई इंडियन्सने इंडियन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 33 व्या सामन्यात पंजाब किंग्सला शेवटच्या षटकात 9 धावांनी पराभूत केले. मुंबईचा हा सात सामन्यांतील तिसरा विजय ठरला.

दरम्यान गुरुवारी (18 एप्रिल) झालेल्या या सामन्यात मुंबईला आशुतोष शर्मा आणि शशांक सिंग या जोडीने चांगलेच टेंशन दिले होते. परंतु, अखेर मुंबईने विजय मिळवण्यात यश मिळवले. मुंबईच्या या विजयानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने यावेळी आशुतोषचेही कौतुक केले.

Ashutosh Sharma | Hardik Pandya | IPL 2024
PBKS vs MI: कॅप्टन हार्दिककडे दुर्लक्ष करत मधवालने घेतला रोहितचा सल्ला? Video होतोय व्हायरल

या सामन्यानंतर हार्दिक म्हणाला, 'हा सामना खुप चांगला झाला, सर्वांचीच कसोटी पाहण्यात आली. साधारणत: जेव्हा आपण विचार करतो की सामन्यात आपण पुढे आहोत, पण आम्हाला माहित आहे की आयपीएलमध्ये अशाप्रकारचे सामने होतात.'

'आशुतोषने फलंदाजीला आल्यानंतर ज्याप्रकारे खेळ केला, तो अविश्वसनीय होता. जवळपास प्रत्येक चेंडू त्याच्या बॅटच्या मध्ये लागत होता. त्याच्यासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी खूश आहे. आम्ही टाईमआऊटमध्येही चर्चा केली की या सामन्यात आपण लढत राहू. आम्ही काही षटकांत कमजोर पडलो. अखेर विजय हा विजयच असतो.'

Ashutosh Sharma | Hardik Pandya | IPL 2024
IPL 2024, Points-Table: पंजाबविरुद्ध विजयाने मुंबईला फायदा, पाँइंट्स-टेबलमध्ये घेतली उडी; जाणून घ्या संघांच्या क्रमवारी

या सामन्यात सूर्यकुमार यादवने केलेल्या 53 चेंडूत 78 धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 20 षटकात 7 बाद 192 धावा केल्या होत्या. त्यानंतर पंजाब किंग्सने 77 धावांतच 6 विकेट्स गमावले होते. परंतु, नंतर शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी सातव्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली. शशांक 41 धावा करून बाद झाला.

त्यानंतर आशुतोषने आक्रमक खेळ करत हरप्रीत ब्रारबरोबर आठव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. परंतु, पंजाब विजयाच्या जवळ असताना आशुतोष बाद झाला. त्याने 28 चेंडूत 61 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 7 षटकार मारले. आशुतोष बाद झाल्यानंतर पंजाबचा डाव 19.1 षटकात 183 धावांवर संपुष्टात आला.

गोलंदाजीत पंजाबकडून हर्षल पटेलने 3 विकेट्स घेतल्या, तर मुंबईकडून गोलंदाजीत जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com