हार्दिक पांड्या पुन्हा स्ट्रेचरवर; गुजरातसह टीम इंडियाचीही चिंता वाढली

Hardik Pandya Stretcher Photo Gone Viral
Hardik Pandya Stretcher Photo Gone ViralESAKAL

मुंबई : पंजाब किंग्जबरोबरचा सामना अखेरच्या दोन चेंडूवर दोन षटकार मारत जिंकणाऱ्या गुजरात टायटन्ससाठी चिंता वाढवणारे फोटो समोर आले आहेत. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या हा ड्रेसिंग रूममधील स्ट्रेचरवर (Hardik Pandya Stretcher) पाठीला मसाज घेत असताना दिसत आहे. हा फोटो पंजाब किंग्जच्या (GT vs PBKS) सामन्यावेळीचे आहे. याच सामन्यात हार्दिक पांड्या बॅटिंग करताना देखील खाली बसलेला दिसत होता. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या पाठ दुखीने पुन्हा उचल खालली आहे का अशी शंका निर्माण झाली आहे.

Hardik Pandya Stretcher Photo Gone Viral
Maharashtra Kesari : कोण आहे मानाची गदा मिळवणारा पृथ्वीराज पाटील

आयपीएलची (IPL 2022) नवखी टीम गुजरात टायटन्सचे (Gujarat Titans) नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे. गुजरातने हंगामाची दमदार सुरूवात करत विजयाची हॅट्ट्रिक साधली. मात्र या विजयाच्या आनंदावर कर्णधार हार्दिकच्या एका फोटोने पाणी फेरले. हार्दिक पांड्याने यंदाच्या आयपीएल हंगामात गेल्या काही सामन्यांपासून आपला 4 षटकांचा कोटा पूर्ण केला होता. त्यावेळी आता जुना हार्दिक परतला अशी भावना चाहत्यांची झाली होती. त्यातच तो नवीन चेंडूवर संघासाठी विकेट मिळवून देत होता. फलंदाजीतही तो हळूहळू आपली लय पकडत होता. मात्र अचानक त्याचा स्ट्रेचरवर झोपलेला फोटो व्हायरल होऊ लागला आणि त्याच्या फिटनेसबाबत (Hardik Pandya Fitness) पुन्हा चर्चा सुरू झाली.

Hardik Pandya Stretcher Photo Gone Viral
VIDEO : नटराजनने 'ड्रीम' बॉलवर ऋतुराजची दांडी झाली गुल

टी 20 वर्ल्डकपमध्ये केली नव्हती गोलंदाजी

हार्दिक पांड्याला पाठदुखीचा त्रास खूप जुना आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये हार्दिक पांड्याने महत्वाच्या सामन्यात गोलंदाजी केली नव्हती. त्यावेळी त्याच्यावर खूप टीका झाली होती. निवडसमितीने त्यावेळी हार्दिक फिट असून तो गोलंदाजी करेल असे सांगण्यात आले होते. या अटीवरच त्याला संघात स्थान देण्यात आले होते. हार्दिकचे बॅट देखील टी 20 वर्ल्डकपमध्ये शांतच होती.

Hardik Pandya Stretcher Photo Gone Viral
दारू पिऊन जीवाशी खेळ ही चेष्टेची गोष्ट नाही; रवी शास्त्री चहल प्रकरणात बोलले

रणजी ट्रॉफीमधून घेतली होती माघार

दरम्यान, गोलंदाजी न करणारा हार्दिक पांड्या भारतीय संघातून बाहेर फेकला गेला. त्यानंतर निवडसमितीने भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल तर तू रणजी ट्रॉफीमध्ये खेळला पाहिजेस असे सांगितले होते. मात्र हार्दिकने रणजी ट्रॉफीमधून माघार घेतली. त्यावेळी पांड्या कसोटीतून निवृत्ती देखील घेईल अशा बातम्या आल्या होत्या. तेव्हाही पांड्या फिट आहे की नाही याची कोणतीच कल्पना निवडसमितीला नाही असे निवडसमिती प्रमुख चेतन शर्मा यांच्या वक्तव्यावरून दिसून येत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com