
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी (२६ मे) पंजाब किंग्सने जयपूरला झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला ७ विकेट्सने पराभूत केले आहे. हा दोन्ही संघांचा प्लेऑफपूर्वीचा अखेरचा साखळी सामना होता. पंजाबने या विजयासह पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर उडी मारली.
इतकेच नाही, तर त्यांनी पहिल्या दोन क्रमांकामध्येही आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे त्यांना क्वालिफायनर १ सामन्याचे तिकीटही पक्के केले. ते आता त्यांच्या घरच्या मैदानात म्हणजेच मुल्लनपूर येथे क्वालिफायर १ चा सामना खेळताना दिसतील.
मात्र, मुंबई इंडियन्सला या पराभवामुळे चौथ्या क्रमांकावरच रहावे लागले आहे. त्यामुळे त्यांना आता एलिमिनेटर सामना खेळावा लागेल.