

Hardik Pandya Mumbai Indians controversy
esakal
Truth behind Hardik Pandya unfollow rumor: इंडियन प्रीमियर लीग (IPL)२०२६ चा हंगाम सुरू आहे. हंगामाचे आता काहीच आठवडे शिल्लक राहिले आहेत. हा हंगाम पाच वेळचा विजेता संघ मुंबई इंडियन्ससाठी(Mumbai Indians) फारसा चांगला ठरला नाही. या हंगामात त्यांनी आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये केवळ ३ सामन्यांत मुंबईने विजय मिळवला आहे, तर ८ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या खराब कामगिरीमुळे ते आता अधिकृतरित्या प्ले-ऑफमधून बाहेर झाले आहेत.