

HARDIK PANDYA
esakal
HARDIK PANDYA MISSES THE MATCH BACK INJURY: इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा ४७ वा सामना सोमवारी मुंबई आणि लखनौ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या मैदानात उतरला नाही. या बाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वानखेडेवर नाणेफेकीच्या वेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून मैदानात उतरला तो सूर्यकुमार यादव. सूर्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा देखील या सामन्यात ५ सामन्यांनंतर मैदानात परतला. या सामन्यात हार्दिक पंड्या का खेळला नाही हे देखील मुंबई इंडियन्सने स्पष्ट केलं आहे.