IPL 2024 : मयंक अग्रवालला 'फ्लाइंग किस' करणं हर्षित राणाला भोवलं! 'त्या' कृत्यानंतर BCCI ने घेतली मोठी ॲक्शन

Harshit Rana and Mayank Agarwal News : वेगवान गोलंदाज हर्षित राणाने अंतिम षटकात शानदार गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला.
Harshit Rana and Mayank Agarwal News Marathi
Harshit Rana and Mayank Agarwal News Marathisakal

IPL 2024 Harshit Rana and Mayank Agarwal News : वेगवान गोलंदाज हर्षित राणाने अंतिम षटकात शानदार गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला, परंतु सामन्यादरम्यान त्याने दोनदा असे कृत्य केले ज्यामुळे त्याला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज मयंक अग्रवाल आणि हेनरिक क्लासेन यांना बाद केल्यानंतर त्यानी पाहून त्याने जे काही केलं त्यामुळे तो अडचणीत आला आहे. हर्षितमुळे कोलकाताने शनिवारी रात्री खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा चार धावांनी पराभव करत आयपीएलच्या 17व्या हंगामाची विजयी सुरुवात केली.

Harshit Rana and Mayank Agarwal News Marathi
24.75 कोटी पाण्यात... IPL 2024 मध्ये महागड्या मिचेल स्टार्कने टाकली सर्वात महागडे ओव्हर, दिल्या इतक्या धावा

केकेआरने हैदराबादसमोर विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मयंक आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादला वेगवान सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी मिळून 5.3 षटकात 60 धावा केल्या होत्या, पण सहावे षटक टाकायला आलेल्या हर्षितने मयंकला आऊट केले.

हर्षितने केकेआरला पहिले यश मिळवून दिले, ज्याची संघाला खूप गरज होती. मात्र, मयंकची विकेट घेतल्यानंतर हर्षित खूप उत्तेजित झाला. त्यानंतर तो मयंककडे गेला आणि त्याला फ्लाइंग किस दिला. शांत स्वभावाच्या मयंकला हर्षितची ही शैली आवडली नाही आणि तो या वेगवान गोलंदाजाकडे बघतच राहिला, पण काहीही न बोलता तो पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला.

Harshit Rana and Mayank Agarwal News Marathi
IPL 2024 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाही तर... 'या' शहरात रंगणार फायनलचा थरार?

यानंतर शेवटच्या षटकात हेनरिक क्लासेनला बाद करून हर्षितने असेच काहीसे केले. क्लासेनने हैदराबादला सामना जिंकण्याच्या जवळ आणले होते, पण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना हर्षितच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. येथून सामना केकेआरच्या बाजूने फिरला आणि संघ विजयाची नोंद करण्यात यशस्वी झाला.

हर्षितच्या गैरवर्तणुकीमुळे आयपीएलने त्याच्यावर मॅच फीच्या 60 टक्के दंड ठोठावला आहे. आयपीएलनुसार हर्षितने सामन्यादरम्यान दोनदा आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल-1चे उल्लंघन केले आहे. या कारणामुळे केकेआरच्या या गोलंदाजाला मॅच फीच्या 60 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. निवेदनानुसार, हर्षितने त्याच्यावर लावण्यात आलेला दंड स्वीकारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com