24.75 कोटी पाण्यात... IPL 2024 मध्ये महागड्या मिचेल स्टार्कने टाकली सर्वात महागडे ओव्हर, दिल्या इतक्या धावा

गेल्या शनिवारी आयपीएल 2024 चा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. यजमान कोलकाताने हैदराबादचा 4 धावांनी पराभव करत सलामीचा सामना जिंकला.
kkr vs srh mitchell starc Marathi News
kkr vs srh mitchell starc Marathi Newssakal

IPL 2024 KKR vs SRH Mitchell Starc : गेल्या शनिवारी आयपीएल 2024 चा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. यजमान कोलकाताने हैदराबादचा 4 धावांनी पराभव करत सलामीचा सामना जिंकला.

जरी हा सगळा सामना कोलकाताच्या हातात होता. पण सनरायझर्स हैदराबादच्या डावाच्या 19व्या षटकात असे काही पाहायला मिळाले, ज्याची कदाचित कोणालाच अपेक्षा नव्हती. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कने आयपीएल 2024 मधील सर्वात महागडे षटकही टाकले आहे.

kkr vs srh mitchell starc Marathi News
IPL 2024 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाही तर... 'या' शहरात रंगणार फायनलचा थरार?

केकेआरने आयपीएल 2024 च्या लिलावात 24.75 कोटी रुपये खर्च करून स्टार्कला आपल्या संघात घेतले. पण पहिल्या सामन्यातील त्याच्या कामगिरीने केकेआरची चिंता वाढवली आहे. खरंतर, सनरायझर्स हैदराबादच्या डावातील 19 वे षटक टाकण्यासाठी मिचेल स्टार्क आला होता.

त्यावेळी हैदराबादला विजयासाठी 39 धावांची गरज होती. आणि असे वाटले की हैदराबाद हारली. पण क्लासेनचा प्लॅन वेगळाच होता. स्टार्कच्या पहिल्याच बॉलवर त्याने गगनचुंबी षटकार ठोकला. त्यानंतर परत सलग दोन चेंडूंवर 2 षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. पुढच्या चेंडूवर क्लासेनने सिंगल घेतली. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शाहबाज अहमद स्ट्राईकवर होता, आणि त्याने त्या बॉलवर षटकार मारला. अशाप्रकारे हैदराबादने स्टार्कच्या एका षटकात 26 धावा केल्या.

kkr vs srh mitchell starc Marathi News
IPL 2024 : रोहितला कर्णधार पदावरून काढल्यानंतर मुंबईची आज गुजरातशी सलामी! पांड्या कोणाला देणार संधी?

मिचेल स्टार्क हा आयपीएल इतिहासातील लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 24.75 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन विकत घेतले.

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 208 धावा केल्या. 209 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्सने 7 गड्यांच्या मोबदल्यात 204 धावा केल्या. आणि 4 धावांनी पराभव झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com