
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत पाचवेळच्या मुंबई इंडियन्सची कामगिरी अद्याप अपेक्षित अशी झालेली नसली, तरी त्यांच्या युवा खेळाडूंची चर्चा मात्र चांगलीच रंगली. मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत असे अनेक देशाच्या कानाकोपऱ्यातून शोधून खेळाडू तयार केले आहेत.
यात जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, नमन धीर, मयंक मार्कंडे अशी अनेक नावं घेता येतील. आता विग्नेश पुथुर, अश्वनी कुमार यांचीही नावं सामील झाली आहेत. या दोघांनीही यावर्षी मुंबई इंडियन्ससाठी खास कामगिरी केली आहे.