
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यांनी गुरुवारी क्वालिफायर १ सामन्यात पंजाब किंग्सला ८ विकेट्सने पराभूत करत चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात बंगळुरूने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागात पंजाबपेक्षा वरचढ कामगिरी केली.