इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिट्लस हे संघ प्ले ऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. आता १५ सामने शिल्लक आहेत आणि यातून प्ले ऑफचे चार संघ ठरणार आहेत. आयपीएलच्या या पर्वाआधी मेगा ऑक्शन पार पडलं आणि रिषभ पंत, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल या खेळाडूंवर मोठी बोली लागली. पण, यापैकी बऱ्याच खेळाडूंना मिळालेल्या रकमेचं मोल फेडता आलेलं नाही.