रोनाल्डोचा मेंदू स्कॅन करेन; फिटनेससाठी कोहलीचा 'विराट' प्लॅन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli vs Cristiano Ronaldo

रोनाल्डोचा मेंदू स्कॅन करेन; फिटनेससाठी कोहलीचा 'विराट' प्लॅन

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पोर्तुगाल फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) जबऱ्या फॅन आहे. विराटची क्रिकेटच्या मैदानातील आक्रमकता आणि फिटनेस हा फुटबॉल स्टार रोनाल्डोप्रमाणेच आहे.

कोहली त्याला फॉलोही करतो. जगातील लोकप्रिय खेळाडूंच्या यादीत टॉपला असलेल्या रोनाल्डोसंदर्भात विराट कोहलीनं मोठं वक्तव्य केले आहे. जर रोनाल्डोच्या रुपात जाग आली तर सर्वात आधी मेंदू स्कॅन करेन, असे म्हणत फुटबॉल स्टारची जीवन शैली जाणून घ्यायला उत्सुक असल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे.

हेही वाचा: Video : केनच्या सुपर कॅचवर काव्या झाली फिदा!

रोनाल्डोची कामगिरी आणि फिटनेसमुळे कोहली त्याचा मोठा चाहता झाला. इंडियन प्रीमियर लीग फ्रेंचायजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फोटोशूट वेळी कोहलीने रोनाल्डोवर कौतुकाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. आरसीबीच्या ‘बिहाइंड द सीन’ या सीरीजमध्ये विराट कोहलीला सर्वात आवडता खेळाडू कोण? असा प्रश्न विचारण्यात आला आहोत. यावेळी कोहलीने ख्रिस्तियानो रोनाल्डोचे नाव घेतले. पुढे त्याला विचारण्यात आले की, जर रोनाल्डोच्या रुपात जाग आली तर काय करशील? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावेळी विराट कोहलीने ‘‘रोनाल्डोची मानसिकता इतकी मजबूत कशी? हे जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा मी मेंदू स्कॅन करेन, असे विराट कोहली म्हणाला.

हेही वाचा: IPL 2022 : सीएसकेच्या पराभवाच्या हॅट्ट्रिकमागे ग्राऊंड स्टाफ 'केमिकल लोचा'

या शोमध्ये कोहलीने क्रिकेटच्या फिल्डवरील सर्वात धक्कादायक आणि आनंददायी क्षण कोणता होता, यावरही भाष्य केले. 2016 मध्ये आयपीएलमध्ये आरसीबीचा फायनलमध्ये झालेला पराभव आणि याच वर्षी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत वानखेडेच्या मैदानात वेस्ट इंडीज विरुद्ध गमावलेला सामना धक्कादायक होता, असे तो म्हणाला. हे दोन क्षण तो अजूनही विसरलेला नाही. 2016 मध्ये गुजरात लायन्स विरुद्ध क्वालिफायरची लढत अविस्मरणीय आहे, असे त्याने सांगितले. यावेळी मोहम्मद सिराज आणि आरसीबी कॅप्टन फाफ डुप्लेसीस देखील सहभागी होते. या दोघांनी टेनिस स्टार रॉजर फेडरर आवडते खेळाडू असल्याचे सांगितले.

Web Title: If I Wake Up As Cristiano Ronaldo The First Thing I Will Do Is Scan My Brain Virat Kohli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..