
भारताचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माचा बुधवारी (३० एप्रिल) ३८ वा वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या जगभरातून त्याच्या चाहत्यांकडून आणि आजी-माजी खेळाडूंकजून शुभेच्छा मिळत आहेत.
रोहित सध्या मुंबई इंडियन्ससोबत असून आयपीएल २०२५ मध्ये व्यग्र आहे. पण असे असले तरी मुंबई इंडियन्सकडून त्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला आहे.