IPL 2022: मुंबईचा मलिंगा राजस्थान रॉयल्सकडून खेळणार 'दुसरी' इनिंग | Indian Premier League 2022 Lasith Malinga | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 Lasith Malinga appoint as fast bowling coach of Rajasthan Royals

IPL 2022: मुंबईचा मलिंगा राजस्थान रॉयल्सकडून खेळणार 'दुसरी' इनिंग

श्रीलंकेचा माजी वेगावान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) अनेक सामन्यात विजय मिळवून देणारा लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आयपीएल 2022 (IPL 2022) पासून आपली दुसरी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र कधीकाळी मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का असलेला मलिंगा निवृत्तीनंतरची आपली दुसरी इनिंग मुंबईकडून नाही तर राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सने मलिंगाला आपला वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक (Fast Bowling Coach) नियुक्त केले आहे. (IPL 2022 Lasith Malinga appoint as fast bowling coach of Rajasthan Royals)

हेही वाचा: साक्षी धोनीनं शेअर केली क्रिकेटर्सच्या बायकांची 'अनटोल्ड स्टोरी'

लसिथ मलिंगा आता राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक कुमार संगकाराच्या टीमचा एक भाग असणार आहे. लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सच्या चार वेळा आयपीएल (Indian Premier League) विजेत्या संघाचा महत्वाचा भाग होता. त्याने जानेवारी 2021 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. राजस्थान रॉयल्सने सर्वात पहिली 2008 ची आयपीएल स्पर्धा जिंकून धडाक्यात सुरूवात केली होती. मात्र गेल्या हंगामात त्यांना प्ले ऑफमध्येही प्रवेश मिळवता आला नव्हता. ते गुणतालिकेत 10 गुणांसह सातव्या स्थानावर होते.

हेही वाचा: VIDEO: शेन वॉर्नने स्तुती केलेल्या शाहिदला लाभला क्रिकेटच्या देवाचा स्पर्श

मात्र राजस्थान रॉयल्सने गेल्या महिन्यात झालेल्या आयपीएल 2022 च्या लिलावात (IPL 2022 Auction) अनेक मोठ्या खेळाडूंना सामावून घेतले आहे. यात शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन यांचा समावेश आहे. याचबरोबर जोस बटलर आणि संजू सॅमसन हे धडाकेबाज फलंदाज देखील राजस्थानच्या संघात आहेत.

हेही वाचा: VIDEO: कॅरीचा पाकिस्तानातील स्विमिंगपूल मधला 'हा' किस्सा होतोय व्हायरल

Web Title: Indian Premier League 2022 Lasith Malinga Appoint As Fast Bowling Coach Of Rajasthan Royals

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top