IPL 2024 Schedule : CSK vs RCB ने श्रीगणेशा! मुंबई पहिल्याच सामन्यात गुजरातशी भिडणार, जाणून घ्या शेड्युल

IPL 2024 Schedule Announcement Updates: CSK vs RCB in opener on March 22 : लोकसभा निवडणूक आणि आयपीएल 2024 एकाचवेळी होत आहे. बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केलं आहे.
IPL 2024 Schedule
IPL 2024 ScheduleESAKAL

IPL 2024 Schedule Announcement CSK vs RCB Openers : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा हंगाम हा येत्या 22 मार्चपासून सुरू होणार आहे. यंदाचा 17 वा हंगाम आणि लोकसभेची निवडणूक एकाचवेळी आल्याने आयपीएलचे शेड्युल कसे असेल याबाबत सर्वांना उत्सुकता होती. चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून नुकतेच आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. हंगामाची सुरूवात ही चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या सामन्याने होणार आहे. हा सामना 22 मार्चला होणार आहे.

IPL 2024 Schedule
IPL 2024 15 Day Schedule : आयपीएलचे 15 दिवसांचेच शेड्युल; लोकसभा निवडणुकीमुळं अर्धा हंगाम होणार परदेशात?

आयपीएल 2024 चा पहिला सामना हा 22 मार्चला चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात होणार आहे. मात्र 24 मार्च रोजी होणाऱ्या सामन्याकडेही सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. हा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.

गेल्या हंगामात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या होता. आता तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे. त्यामुळे हा सामना सर्वात हाय व्होल्टेज असण्याची शक्यता आहे. गुजरातचे नेतृत्व हे सर्वात युवा कर्णधार, 24 वर्षाचा शुभमन गिल करणार आहे.

IPL च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक (First 21 Matches Schedule of IPL)

  • 22 मार्च चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - चेन्नई, रात्री ८ वा.पासून

  • 23 मार्च पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स - मोहाली, दुपारी ३.३० वा. पासून

  • 23 मार्च कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद - कोलकाता, रात्री ८ वा. पासून

  • 24 मार्च राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - जयपूर, दुपारी ३.३० वा.पासून

  • 24 मार्च गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स- अहमदाबाद, रात्री ८ वा. पासून

  • 25 मार्च रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स - बेंगळुरू, रात्री ८ वा. पासून

  • 26 मार्च चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स - चेन्नई, रात्री ८ वा.पासून

  • 27 मार्च सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स - हैदराबाद, रात्री ८ वा. पासून

  • 28 मार्च राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - जयपूर, रात्री ८ वा. पासून

  • 29 मार्च रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, बेंगळुरू, रात्री ८ वा. पासून

  • 30 मार्च लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स -लखनौ, रात्री ८ वा. पासून

  • 31 मार्च गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद-अहमदाबाद, दुपारी ३.३० वा. पासून

  • 31 मार्च दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, विशाखापट्टणम, रात्री ८ वा. पासून

  • 1 एप्रिल मुंबई इंडियन्स वि राजस्थान रॉयल्स -मुंबई, रात्री ८ वा. पासून

  • 2 एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - बेंगळुरू, रात्री ८ वा. पासून

  • 3 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स- विशाखापट्टणम, रात्री ८ वा. पासून

  • 5 एप्रिल गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स- हैदराबाद, रात्री ८ वा

  • 6 एप्रिल राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- जयपूर, रात्री ८ वा. पासून

  • 7 एप्रिल मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स- मुंबई, दुपारी ३.३० वा.पासून

  • 7 एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स -लखनौ, रात्री ८ वा. पासून

IPL 2024 Schedule
IPL 2024 : गुजरात टायटन्सला मोठा धक्का! Mohammed Shami आयपीएल मधून बाहेर, जाणून घ्या कारण

आयपीएल 2024 चा पहिला सामना हा रात्री 8 वाजता होणार आहे. त्यानंतर रात्रीचे सामने हे रात्री 7.30 वाजता आणि दुपरचे सामने हे 3.30 मिनिटांनी सुरू होणार आहेत. बीसीसीआने आज फक्त पहिल्या 21 सामन्यांसाठीचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.

उरलेल्या सामन्यांंचे वेळापत्रक निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर करण्यात येतील. बीसीसीआयने लोकसभेच्या निवणुका असल्या तरी यंदाचा हंगाम भारताताच खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आयपीएलचे उर्वरित शेड्युल कधी जाहीर होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com