esakal | IPL 2021 : लिटल मास्टर गावसकरांनी मुंबईकरांना दिला उपदेशाचा डोस
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar Yadav and Ishan Kishan

लिटल मास्टर गावसकरांनी मुंबईकरांना दिला उपदेशाचा डोस

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारताचे दिग्गज क्रिकेट सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मुंबई इंडियन्सच्या युवा खेळाडूंवर तोफ डागली आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स स्पर्धेत संघर्ष करताना दिसत आहे. मुंबई बॅकफूट असण्यामागे फलंदाजीतील चुका कारणीभूत असल्याचे कर्णधार रोहित शर्माने कबुल केले होते. त्यानंतर मध्यफळीतील जबाबदारी बजवण्यात अपयशी ठरत असलेल्या सूर्यकुमार यादव आणि इशांत किशनच्या ढिसाळ कामगिरीबद्दल गावसकरांनी मोठे वक्तव्य केले आहे.

...म्हणून सुर्यकुमार आणि इशान किशन ढिले पडलेत

मुंबई इंडियन्सकडून खेळणारा सुर्यकुमार यादव आणि इशान किशन (Suryakumar Yadav And Ishan Kishan) भारतीय संघात निवड झाल्यानंतर थोडे ढिले पडले आहेत, असे गावसकरांनी म्हटले आहे. सुर्यकुमार आणि इशान यंदाच्या आयपीएल हंगामात संघर्ष करताना दिसत आहेत. सुर्यकुमार यादवने 12 सामन्यात 18.50 च्या सरासरीने केवळ 222 धावा केल्या आहेत. यात 56 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

हेही वाचा: IPL 2021, Orange Cap Race : नो मुंबईकर; टॉप टेनमध्ये कुणाची हवा?

स्टार स्पोर्ट्सच्या 'क्रिकेट कनेक्टेड' या कार्यक्रमात गावसकर म्हणाले की, भारतीय टीममध्ये समावेश झाल्यापासून सुर्यकुमार यादव आणि इशान किशन निवांत झाल्याचे दिसते. त्यांनी जे मोठे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला ते केवळ टीम इंडियाची कॅप डोक्यावर चढवल्यामुळे खेळल्यासारखे वाटले, असा टोला गावसकरांनी मुंबईकरांना लगावला आहे.

हेही वाचा: IPL 2021: 'हाच' मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठा धक्का- गावसकर

सुर्यकुमार यादवने यावर्षी मार्चमध्ये इंग्लंड विरुद्धच्या टी 20 सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जुलैमध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडेत पदार्पण केले. कोणत्याही प्रकारात खेळताना शॉट सिलेक्शन खूप महत्त्वाचे आहे. या दोघांनी यावर लक्ष्य द्यायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिलाय.

loading image
go to top