esakal | IPL 2021, Orange Cap Race : नो मुंबईकर; टॉप 10 मध्ये कुणाची हवा?
sakal

बोलून बातमी शोधा

Shikhar Dhavan And Ruturaj Gaikwad

IPL 2021, Orange Cap Race : नो मुंबईकर; टॉप टेनमध्ये कुणाची हवा?

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021, Orange Cap Race : आयपीएलच्या 14 व्या हंगामात भारतीय फलंदाजांनी बहरदार खेळ करुन दाखवला आहे. हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल दहा खेळाडूंमध्ये 8 भारतीय खेळाडूंची नावे आहेत. मागील वर्षी ऑरेंज कॅप पटकवणारा पंजाब किंग्जचा कर्णधार यंदाच्या वर्षीही अव्वलस्थानी दिसतोय. पण यंदा त्याला ही कॅप आपल्याकडे ठेवणं मुश्कील आहे. चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतूराज गायकवाड आणि दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवन हे त्याला तगडी फाईट देत आहेत. चेन्नई आणि दिल्ली संघाचे प्ले ऑफमध्ये स्थान पक्के झाल्यामुळे ऋतूराज आणि शिखर धवन यांच्यात शेवटपर्यंत फाइट होईल, असे दिसते. जाणून घेऊयात यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणारे टॉप टेन बॅटर...

1- केएल राहुल (पंजाब किंग्ज): (सामने - 12, धावा - 528, स्ट्राइक रेट - 129.09, अर्धशतक/शतक - 5/0, सर्वोच्च धावसंख्या - 91*)

2- ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपरकिंग्ज): (सामने - 13, धावा - 521, स्ट्राइक रेट - 138.93, अर्धशतक/शतक - 3/1, सर्वोच्च धावसंख्या - 101*)

3- शिखर धवन (दिल्ली कॅपिटल्स): (सामने - 13, धावा - 501, स्ट्राइक रेट - 128.46, अर्धशतक/शतक - 3/0, सर्वोच्च धावसंख्या - 92)

4- संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स): (सामने - 12, धावा - 480, स्ट्राइक रेट - 139.53, अर्धशतक/शतक - 2/1, सर्वोच्च धावसंख्या - 119)

हेही वाचा: देशाच्या 14 वर्षीय लेकीचा सुवर्ण वेध,अनुभवी नेमबाजात ठरली भारी!

5- फाफ डू प्लेसिस (चेन्नई सुपरकिंग्ज): (सामने - 13, धावा - 470, स्ट्राइक रेट - 137.42, अर्धशतक/शतक - 4/0, सर्वोच्च धावसंख्या - 95*)

6- मयंक अग्रवाल (पंजाब किंग्ज): (सामने - 11, धावा - 429, स्ट्राइक रेट - 142.05, अर्धशतक/शतक - 4/0, सर्वोच्च धावसंख्या - 99*)

7- ग्लेन मॅक्सवेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु): (सामने - 12, धावा - 407, स्ट्राइक रेट - 145.35, अर्धशतक/शतक - 5/0, सर्वोच्च धावसंख्या - 78)

8- विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु): (सामने - 12, धावा - 357, स्ट्राइक रेट - 121.42, अर्धशतक/शतक - 3/0, सर्वोच्च धावसंख्या - 72*)

9- राहुल त्रिपाठी (कोलकाता नाइटरायडर्स): (सामने - 13, धावा - 356, स्ट्राइक रेट - 142.40, अर्धशतक/शतक - 2/0, सर्वोच्च धावसंख्या - 74*)

10- पृथ्वी शॉ (दिल्ली कॅपिटल्स): (सामने - 12, धावा - 353, स्ट्राइक रेट - 157.58, अर्धशतक/शतक -3/0, सर्वोच्च धावसंख्या - 82)

हेही वाचा: MI vs RR : मुंबई इंडियन्सला आज अखेरची संधी

loading image
go to top