CSK vs KKR : CSK vs KKR : पहिल्यांदा बॅटिंग करणं ही CSK साठी धोक्याची घंटा|IPL 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CSK vs KKR

CSK vs KKR : पहिल्यांदा बॅटिंग करणं ही CSK साठी धोक्याची घंटा

sakal_logo
By
सुशांत जाधव

दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात फायनल रंगली आहे. कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गनने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आयपीएलच्या एकंदरीत हंगामाचा विचार केल्यास चेन्नई नवव्यांदा फायनल खेळत आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स तिसरी फायनल खेळत आहे. चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या नेतृत्वाखाली यापूर्वी आठ फायनल खेळल्या आहेत.

यात तीनवेळा त्यांना जेतेपद मिळाले आहे. 2010, 2011 आणि 2018 मध्ये चेन्नईने जेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे कोलकाताने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दोनवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे पहिली ट्रॉफी उंचावताना 2012 मध्ये त्यांनी चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केले होते. तर 2014 मध्ये पंजाब किंग्जला पराभूत करत त्यांनी आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. चेन्नईला पराभूत करुन चेन्नईशी बरोबरी करण्याची त्यांच्याकडे संधी आहे.

हेही वाचा: IPL FINAL Live: KKRने टॉस जिंकला; CSKची प्रथम फलंदाजी

हेही वाचा: IPL FINAL: KKRच्या 'या' ५ क्रिकेटपटूंवर असेल फॅन्सचं लक्ष

चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामात ज्यावेळी पहिल्यांदा बॅटिंग केलीये त्यावेळी 5 सामने त्यांनी गमावले आहेत. दुसरीकडे धावांचा पाठलाग करताना युएईच्या मैदानातील सहा पैकी सहा सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने विजय नोंदवला आहे. ही आकडेवारी पुन्हा जर कोलकाताच्या बाजूने झुकली तर चेन्नईच्या जेतेपदाच्या चौकाराचे स्वप्न अधूरे राहू शकते. कोलकाताचा संघ या आकडेवारीचा कितपत फायदा उठवणार आणि चेन्नईला दबावात टाकून बाजी मारण्यात यशस्वी ठरणा का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

क्रिकेटच्या मैदानात आकडेवारी काहीही सांगत असली तरी मैदानातील कामगिरीच्या जोरावरच निकाल निश्चित होत असतो. धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला कमबॅक कसे करायचं हे चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांसाठी ही आकडेवारी कदाचित फार चिंतेचा विषय वाटणार नाही. धोनीचा संघ कोलकाताला रोखून पुन्हा एकदा जेतेपद पटकावेल, असा विश्वास त्यांना असेल.

loading image
go to top