RCB चा मालक असतो तर कोहलीला कॅप्टन्सी सोडू दिली नसती : लारा

आरसीबी पहिल्या वहिल्या जेतेपदाची प्रतिक्षा संपवले, असे वाटत होते. पण पुन्हा तिची पुनरावृत्ती झाली आणि किंग कोहली ट्रॉफीविनाच राहिला.
Lara And Virat Kohli
Lara And Virat Kohli

आयपीएलच्या (IPL) 2021 14 व्या हंगामातही RBC च्या पदरी निराशा आली. त्यांचा स्पर्धेतील प्रवास एलिमिनेटर राउंडमध्ये संपुष्टात आला. युएईत रंगलेल्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच विराट कोहलीने यंदाच्या हंगामानंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्याच्या नेतृत्वाखालील आरसीबी पहिल्या वहिल्या जेतेपदाची प्रतिक्षा संपवले, असे वाटत होते. पण पुन्हा तिची पुनरावृत्ती झाली आणि किंग कोहली ट्रॉफीविनाच राहिला.

आरसीबीच्या पराभवानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण विराट कोहलीच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत असताना वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने कोहलीकडून बॅटिंग केलीये. जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ माझ्या मालकीचा असता तर मी कोहलीला कॅप्टन्सी सोडूच दिली नसती. कोहीला निर्णय बदलण्यास भाग पाडले असते, असे लाराने म्हटले आहे.

Lara And Virat Kohli
'माझ्या पत्नीला त्रास देऊ नका'; RCB च्या क्रिकेटपटूची विनंती

क्रिकेट डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये ब्रायन लाराने विराट कोहलीच्या कॅप्टन्सीवर भाष्य केले. लारा म्हणाल की, आरसीबी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय हा विराटचा वैयक्तिक आहे. जर मी त्या फ्रेंचायझी संघाचा मालक असतो तर त्याचे मन परिवर्तन करुन त्याला संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवले असते. विराट कोहलीला हवी तशी टीम देण्याचा मी प्रयत्न केला असता, असेही लारा यावेळी म्हणाले.

Lara And Virat Kohli
कोहली शेवटपर्यंत गोंधळलेला दिसला; वॉनची तिखट प्रतिक्रिया

विराट कोहलीने कर्णधार पद सोडण्याची घोषणा करताना शेवटपर्यंत आरसीबीकडून खेळणार असल्याचेही स्पष्टीकरण दिले होते. आगामी काळात तो घरच्या संघाकडून म्हणजे दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसेल, अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगली होती. आगामी हंगामापूर्वी होणाऱ्या मेगा लिलावानंतरच यासंदर्भात चित्र स्पष्ट होईल. कोहलीला रिटेन करत बंगळुरु नवी संघ बांधणी कशी करणार? कर्णधार म्हणून कोहली त्याच्या लाडल्या लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार का? असे अनेक प्रश्न सध्याच्या घडीला आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे ही मेगा लिलावानंतरच स्पष्ट होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com